कोण आहेत तैवानचे नवीन राष्ट्राध्यक्ष William Lai? राजकारणात येण्यापूर्वी...

Who is William Lai Taiwan’s New President: सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे विल्यम लाई चिंग-ते हे तैवानचे पुढील राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे.
Who is William Lai Taiwan’s New President
Who is William Lai Taiwan’s New PresidentDainik Gomantak
Published on
Updated on

Who is William Lai Taiwan’s New President: तैवानमध्ये शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. देशातील प्रमुख विरोधी पक्ष कुओमिंतांगचे उमेदवार Hou Yu-ih यांनी आपला पराभव मान्य केल्याची बातमी समोर आली आहे. यासह, सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे विल्यम लाई चिंग-ते हे तैवानचे पुढील राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. चीनसाठी अनेक समस्या निर्माण करणाऱ्या विल्यम लाई यांनी नुकतेच म्हटले होते की, 'आम्ही चीनशी पुन्हा चर्चा सुरु करण्यास तयार आहोत.' सध्या ते तैवानचे उपाध्यक्ष आहेत. या निवडणुकीत ते सुरुवातीपासूनच तगडे उमेदवार मानले जात होते, हे विशेष.

राजकारणात येण्यापूर्वी ते सर्जन होते

दरम्यान, राजकारणात येण्यापूर्वी विल्यम लाई हे सर्जन होते. 1996 मध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी चीनने तैवानच्या मतदारांना घाबरवण्यासाठी क्षेपणास्त्र चाचण्या आणि लष्करी सराव केल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे लाई यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी राजकारणात प्रवेश केला. विल्यम लाई यांच्या राजवटीत तैवानचे चीनसोबतचे संबंध अधिक ताणले जातील, असे बोलले जात आहे.

Who is William Lai Taiwan’s New President
India-Taiwan Relations: चीनला लागणार मिर्ची! भारत तैवानला पाठवणार एक लाखाहून अधिक कामगार

2010 मध्ये ताइनान शहराचे मेयर झाले

विल्यमने हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. नॅशनल फिजिशियन सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 1996 मध्ये लेजिस्लेटिव्ह युआन निवडणूक लढवली. तैनान सिटीतून त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. येथून सलग चार वेळा विजयी झाल्यानंतर त्यांनी 2010 साली तैनानच्या मेयरची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये ते पुन्हा मेयर झाले.

हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

विल्यम लाई यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1959 रोजी तैपेई काउंटीच्या (आताचे तैपे शहर) उत्तरेकडील किनारपट्टी भागात झाला. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुनर्वसनात प्राविण्य प्राप्त केल्यानंतर, ते हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये गेले जेथे त्यांनी सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. ते स्पाइनल कॉर्डच्या दुखापतींसाठी राष्ट्रीय सल्लागार देखील राहिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com