Coronavirus In North Korea Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरियात कोरोनाचा कहर, 'ताप'ने 6 जणांचा मृत्यू, 1.87 लाख लोकं आयसोलेशनमध्ये

कोरीयन प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले

दैनिक गोमन्तक

कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. आता या विषाणूपासून अस्पर्श असलेला उत्तर कोरिया देखील कोरोना संसर्गाच्या विळख्यात आला आहे. खरं तर, एएफपी वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोविडमुळे शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार, ताप आल्यामुळे येथे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,87,000 लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली. लक्षणे असलेल्या सर्व लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवून उपचार केले जात आहेत.

गुरुवारी, देशात कोविडच्या ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराच्या पहिल्या प्रकरणाची बातमी समोर आली. त्यानंतर प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली, तो बऱ्याच दिवसांपासून तापाने त्रस्त होता. तपास केला असता तो कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या विळख्यात असल्याचे आढळून आले.

अमेरिकेत आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

संपूर्ण जगाला आपल्या संसर्गाचा बळी बनवणाऱ्या या विषाणूची आतापर्यंत सर्वाधिक प्रकरणे अमेरिकेत नोंदवण्यात आली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेत आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, जो आमच्यासाठी अत्यंत दुःखद आकडा आहे. ज्यांनी प्रियजन गमावले आहेत त्यांच्या वेदनेत, दु:खात आम्ही सहभागी आहोत.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) च्या मते, देशाचे नेते किम जोंग उन यांच्यासह उच्च अधिकार्‍यांनी कोरोनाच्या वाढत्या सक्रमणावर चर्चा करण्यासाठी एक एमर्जन्सी पॉलिटब्युरो बैठक घेतली आणि देशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले. प्योंगयांगचे भाग दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT