गुरुवारी, उत्तर कोरिया (North Korea) मध्ये पहिल्या कोविड -19 (Covid 19)चे प्रकरण आढळून आला आहे. देशाच्या राज्य माध्यमांनी याचे वर्णन 'गंभीर राष्ट्रीय आपत्कालीन घटना' असे केले. उत्तर कोरियातील कोरोना विषाणू जगासमोर येऊन दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे, मात्र आतापर्यंत उत्तर कोरियाने आपल्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती माध्यमांना दिली नव्हती. अधिकृत KCNA वृत्तसंस्थेने म्हटले आहे की कोविडची नवीन नोंदलेली प्रकरणे विषाणूच्या धोकादायक ओमिक्रॉन प्रकाराशी जोडली गेली आहेत. (first covid 19 case has been found in North Korea)
KCNA ने कळवले की, गुरुवारी राजधानी प्योंगयांगमध्ये अनेक लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटने संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) यांनी देशात कोविड प्रतिबंधात्मक उपाय कडक करण्यावर आता भर दिला आहे. किमने सत्ताधारी कोरियन वर्कर्स पार्टीच्या पॉलिटब्युरोची बैठक बोलावली आहे आणि जिथे सदस्यांनी अँटी-व्हायरस उपाय वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. बैठकीदरम्यान, किम यांनी अधिकाऱ्यांना कोविडचा प्रसार वाढू न देण्यास आणि संसर्गाचे स्रोत लवकरात लवकर नष्ट करण्यास सांगितले आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे आणि अधिकाऱ्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लागू सुनावले आहे.
संक्रमित लोकांबद्दल माध्यमांना माहिती दिली नाही
राज्य माध्यमांनी सांगितले की, 'देशात सर्वात मोठी आणीबाणी झाल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी 2020 पासून गेली दोन वर्षे आणि तीन महिन्यांत देश सुरक्षित ठेवण्यात आला होता, मात्र आता त्यात घुसखोरी झालेली आहे. KCNA ने कोविड-19 मुळे किती लोकांना संसर्ग झाला आहे याची माहिती अध्याप दिलेली नाही. उत्तर कोरियामध्ये महामारीच्या सुरुवातीपासूनच देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कोविड धोरण लागू केले होते. देशातील मर्यादित आरोग्य सुविधा आणि जागतिक स्तरावर एकटेपणामुळे किम जोंग चिंतेत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
किम यांना वाटते की या दोन कारणांमुळे कोविडचा देशावर खूप घातक परिणाम उद्भवू शकतो. महामारी सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियातील लोकांना आपत्कालीन क्वारंटाईन पद्धतीमध्ये ठेवावे लागले होते. याअंतर्गत लोकांना बाहेर पडू दिले जात नाही आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात होती. आतापर्यंत उत्तर कोरियाने कोरोनावर ठेवलेल्या नियंत्रणाचे खुप मोठे यश आल्याचे म्हटले आहे. मात्र, आता पहिल्या कोविड पेशंटची बाब मान्य करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.