500 killed in Gaza hospital due to israel's airstrike attack, Hamas claims; Israel denies the allegations. Dainik Gomantak
ग्लोबल

आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी! रुग्णालयावरील हल्ल्यात 500 ठार, Hamas चा दावा; इस्रायलने आरोप फेटाळले

Israel Hamas War: 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत हमास विरोधात बॉम्बफेक मोहीम सुरू केल्यानंतर हा स्फोट गाझामधील सर्वात रक्तरंजित घटना होती.

Ashutosh Masgaunde

500 killed in Gaza hospital due to israel's airstrike attack, Hamas claims; Israel denies the allegations:

हमास-नियंत्रित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मंगळवारी रात्री अल-अहली हॉस्पिटलवर इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 500 लोक मरण पावले.

या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी आणि आश्रय घेतलेले लोक राहत होते. जर हा हल्ला इस्रायलने केलेला दावा खरा असेल तर, 2008 पासून लढलेल्या पाच युद्धांमधील हा सर्वात प्राणघातक इस्रायली हवाई हल्ला असेल.

अल-अहली रुग्णालयातील फोटोंमध्ये रुग्णालयाच्या हॉलला लागलेली आग, काचा तुटलेल्या आणि शरीराचे अवयव परिसरात पसरलेले दिसत आहेत.

मंत्रालयाने सांगितले की किमान 500 लोक मारले गेले आहेत. मात्र अद्याप याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, हमासने एक निवेदन जारी करून हा युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

इस्रायली सैन्याने आरोप नाकारले

इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीमधील शहर आणि आसपासच्या भागातील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर गाझा शहरातील अनेक रुग्णालये शेकडो लोकांसाठी आश्रयस्थान बनली आहेत.

इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, रुग्णालयात मृत्यूची अद्याप कोणतीही माहिती नाही. आम्ही माहिती मिळवू आणि लोकांना अपडेट करू. हा इस्रायलचा हवाई हल्ला होता की नाही हे मला माहीत नाही.

अल जझीराने हा हल्ला इस्रायल केल्याचे वृत्त दिले होते. मात्र, इस्रायली सैन्याच्या ट्विटर अकाउंटवरुन हे वृत्त फेटाळले आहे.

गाझामधील हमासच्या सरकारी मीडिया कार्यालयाने गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ल्याला "युद्ध गुन्हा" म्हटले आहे.

एका निवेदनात म्हटले आहे की, शेकडो आजारी आणि जखमी लोक रुग्णालयात आहेत आणि हवाई हल्ल्यांमुळे इतरांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने विस्थापित करण्यात आले आहे. "शेकडो बळी अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत," असे निवेदनात म्हटले आहे.

इस्रायलने मंगळवारी दक्षिण गाझामधील अनेक भागांवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यांमध्येही अनेक लोक मारले गेले आहेत.

इस्रायलने म्हटले आहे की, हा हल्ला या प्रदेशावर राज्य करणाऱ्या हमासच्या अतिरेक्यांना लक्ष्य करून करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलवर हमासच्या क्रूर हल्ल्यानंतर गाझाला पाणी, इंधन किंवा अन्नधान्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्याच वेळी, मध्यस्थ या प्रदेशातील लाखो त्रस्त नागरिक, मदत गट आणि रुग्णालयांना मदत सहाय्य प्रदान करण्यासाठी धडपडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT