Israel Hamas War: गाझामध्ये संघर्ष सुरूच राहणार, UNSC ने रशियाचा युद्धविराम प्रस्ताव नाकारला

Israel Hamas War: रशियाने म्हटले होते की, ते युद्ध त्वरित थांबवण्याच्या बाजूने आहे. नागरिकांवरील हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला. ते सुरुवातीपासूनच दहशतवादाच्या विरोधात आहेत. रशियाच्या प्रस्तावात हमास आणि 2007 पासून गाझावरील नियंत्रण यावरही चर्चा झाली.
UNSC rejects Russia's cease-fire proposal in Israel-Hamas
UNSC rejects Russia's cease-fire proposal in Israel-HamasDainik Gomantak
Published on
Updated on

UNSC rejects Russia's cease-fire proposal in Israel-Hamas War:

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाचा युद्धविरामाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात 11 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू आहे.

रशियाने युद्धबंदीचा प्रस्ताव आणला होता. केवळ 4 देशांनी त्याच्या बाजूने मतदान केले. त्याचवेळी 5 देश याला विरोध करताना दिसले. 6 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. यासाठी काही वेळापूर्वी मतदान झाले. या प्रस्तावाला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी विरोध केला होता.

इस्रायल-हमास युद्धात युद्धविरामासाठी रशिया सातत्याने आग्रही होता. त्यानंतर मॉस्कोने तयार केलेला मसुदा UNSC मध्ये सादर करण्यात आला. त्याचवेळी सीरियाला युद्धाचा फटका बसू नये, अशी रशियाची इच्छा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण तो त्याचा प्रमुख प्रादेशिक मित्र आहे.

UNSC rejects Russia's cease-fire proposal in Israel-Hamas
पाम ट्री, गुलाबी-पांढऱ्या फुलांनी सजलेल्या गावाची Hamas ने केली माती, जीव वाचवण्यासाठी लोकांनी काढला पळ

आपल्या प्रस्तावाबाबत रशियाने म्हटले होते की, ते युद्ध त्वरित थांबवण्याच्या बाजूने आहेत. नागरिकांवरील हिंसाचाराचा ते निषेध करत आहेत. रशिया सुरुवातीपासूनच दहशतवादाच्या विरोधात आहे.

ओलिसांची तात्काळ सुटका आणि मानवतावादी मदतीची मागणी रशियाकडून करण्यात आली. बाहेरील लोकांनाही येथून तातडीने बाहेर काढण्यात यावे, असेही रशियाने म्हटले होते. रशियाच्या प्रस्तावात हमास आणि 2007 पासून गाझावरील नियंत्रण यावरही चर्चा झाली.

UNSC rejects Russia's cease-fire proposal in Israel-Hamas
Israel Hamas War: हमासचा क्रूरपणा! इस्रायली घरांवर केलेले हल्ले आणि निष्पापांच्या हत्येचे व्हिडिओ समोर

रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा हवाला देत इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लायान म्हणाले की, गाझावर इस्त्रायलच्या सततच्या गोळीबारात आतापर्यंत 700 हून अधिक मुलांसह 2700 जणांना जीव गमवावा लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, इस्रायलने दाट लोकवस्तीच्या किनारपट्टी भागात पाणी, वीज आणि अन्न पुरवठा बंद केला असला तरी भागात पाणी पुरवठा पुन्हा सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com