Lahore Market Dainik Gomantak
ग्लोबल

लाहोरमधील मार्केटमध्ये भीषण स्फोट; 3 ठार, 20 जण जखमी

लाहोरच्या प्रसिद्ध अनारकली बाजारपेठेतील पान मंडीजवळ गुरुवारी झालेल्या शक्तिशाली स्फोटात तीन जण ठार, आणि 20 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील बाजारपेठेत शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तीन जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट लाहोरच्या (Lahore) प्रसिद्ध अनारकली मार्केटच्या पान मंडीमध्ये झाला, जिथे भारतीय वस्तूंची विक्री केली जाते. लाहोर पोलिसांचे प्रवक्ते राणा आरिफ यांनी स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. डॉन न्यूज पेपरच्या वृत्तानुसार, स्फोटामुळे आजूबाजूच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. (3 killed 20 injured in Lahore market blast)

दरम्यान, उपमहानिरीक्षक (Police operations) डॉ. मोहम्मद आबिद (Dr. Mohammed Abid) म्हणाले, “आम्ही स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. 20 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आबिदने मोटारसायकल किंवा टाइम डिव्हाईस मार्केटमध्ये कोणत्याही ठिकाणी लावले जाण्याची शक्यता नाकारली नाही.

ते पुढे म्हणाले, “ या स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे टाइम डिव्हाईसचा वापर झाल्याचे सूचित होते. तथापि, आम्ही आत्तापर्यंत याची पुष्टी करु शकत नाही. दहशतवाद विरोधी विभाग आणि बॉम्ब शोधक पथक अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाच्या प्रकाराची चौकशी करत आहेत. रेस्क्यू 1122 च्या माहितीनुसार, जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून तिथे दोघांचा मृत्यू झाला आहे.

शिवाय, मेयो रुग्णालयाचे (Hospital) वैद्यकीय अधीक्षक डॉ इफ्तिखार यांनी सांगितले की, एका बालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटामुळे मोटारसायकल स्टॉल्स आणि विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. स्फोटानंतर संपूर्ण अनारकली मार्केट बंद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: नारी शक्ती ते गरीब कल्याण! मुख्यमंत्री सावंतांनी मांडली भाजप सरकारच्या कारभाराची 4 प्रमुख सूत्रे; 12 वर्षांच्या विकासाचे भव्य प्रदर्शन

Konkan Railway: गर्दीचा खेळ खल्लास, प्रवास होणार सुपरफास्ट! कोकण रेल्वेचा 4,704 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; गोव्यातील रेल्वे सुविधांवर विशेष भर

Viral Video: "स्वतः मरणार नाहीत, पण दुसऱ्याचा जीव घेतील!", खतरनाक व्हिडिओ बघून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर; स्टंटबाज बाबाचा अजब कारनामा व्हायरल

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

SCROLL FOR NEXT