Chicago Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकन हिंसाविरोधी कार्यकर्त्याच्या अंत्यसंस्कारात गोळीबारात 3 जखमी, शंकेला उधाण

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या तीन लोकांवर हल्लेखोरानी अचानक गोळीबार केला. यामध्ये तीन लोकं जखमी झाले आहे

दैनिक गोमन्तक

शिकागो: अमेरिकेतील शिकागोमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. शनिवारी दुपारी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या तीन लोकांवर हल्लेखोरानी अचानक गोळीबार केला. यामध्ये तीन लोकं जखमी झाले आहे. शिकागो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही पीडितांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. (America Crime)

द सन-टाइम्सच्या वृत्तानुसार, दुपारी 2.30 च्या सुमारास एक व्यक्ती कारमध्ये आला आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या गटावर गोळीबार केला. हे लोक शिकागोमधील दक्षिण बाजूला असलेल्या रोझलँडमधील युनिव्हर्सल कम्युनिटी मिशनरी बॅप्टिस्ट चर्चच्या बाहेर फोटो काढत होते.

या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यात 20 वर्षीय व्यक्तीच्या पोटात, 37 वर्षीय व्यक्तीला मांडीवर आणि 25 वर्षीय व्यक्तीला पाठीत गोळ्या लागल्या आहेत. साक्षीदार करीम हाऊसने वृत्तपत्राला सांगितले की तो त्याचा चुलत भाऊ माईक नॅशच्या अंत्यविधीला गेला होता. माईकचा भाऊ नॅश हा एक हिंसाविरोधी कार्यकर्ता होता ज्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आणि नॅशच्याच अंत्यविधीदरम्यान हा गोळीबार झाल्याने अनेक शंका उपस्थित होत आहे. असे असले तरी गोळीबाराच्या संदर्भात तात्काळ कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT