Gaza Population Verge of Starvation  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: गाझा बनलं उपासमारीचं सर्वात मोठं केंद्र, खाद्यपदार्थांच्या टंचाईनं वाढवलं टेन्शन; UN रिपोर्ट

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सतत गाझावर हवाई हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War:

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सतत गाझावर हवाई हल्ले करत आहे. दरम्यान, गाझामध्ये अन्नधान्याच्या टंचाईने टेन्शन वाढवले आहे. परिस्थिती अशी आहे की, गाझाच्या लोकसंख्येच्या किमान एक चतुर्थांश म्हणजेच 5,76,000 लोक उपासमारीच्या वाटेवर आहेत.

त्याचवेळी, गाझामधील इतर लोकसंख्येलाही खाद्यपदार्थांची गंभीर गरज भासत आहे. त्यामुळे उपासमारीने त्रस्त असलेले लोक मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवर हल्ला करत आहेत. अशा परिस्थितीत गरजूंपर्यंत मदत साहित्य पोहोचवणे कठीण होत आहे. मदत साहित्य लुटण्यासाठी लोक वाटेत ट्रकना लक्ष्य करत आहेत.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्र मानवतावादी कार्यालय आणि संयुक्त राष्ट्र खाद्य आणि कृषी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धग्रस्त गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येला खाद्य असुरक्षिततेचा मोठा धोका आहे. इतकेच नाही तर उत्तर गाझामध्ये परिस्थिती आणखी वाईट आहे, जिथे लोकांना खाद्यपदार्थ आणि इतर मानवतावादी पुरवठ्याची तीव्र टंचाई भासत आहे.

उपासमारीने गाझामधील परिस्थिती बिकट झाली आहे

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र मानवतावादी समन्वयक रमेश रामसिंघम यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, गाझामधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की, गाझाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत आणि उत्तर गाझामधील दोन वर्षांखालील सहा मुलांपैकी एक कुपोषणाने ग्रस्त आहे. जागतिक खाद्य कार्यक्रमाचे उप कार्यकारी संचालक कार्ल स्काऊ यांनी सांगितले की, गाझामधील बाल कुपोषणाची पातळी ही सर्वात गंभीर आहे. परिस्थिती बदलली नाही तर उत्तर गाझामध्ये हाहाकार माजेल.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात 4 मार्चपर्यंत युद्धविराम होईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केली आहे. युद्धविरामाच्या अटींनुसार, गाझामधील रुग्णालयांची दुरुस्ती केली जाईल, दररोज 500 ट्रक गाझामध्ये मानवतावादी मदत घेऊन पोहोचतील. युद्धविरामाच्या मसुद्यात इस्त्रायली आणि हमास दोघेही ओलिसांची सुटका करतील. त्याचबरोबर यामध्ये विस्थापित नागरिकांना परत आणण्याचीही तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT