22 people found dead inside nightclub in East London South Africa
22 people found dead inside nightclub in East London South Africa  Twitter
ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेतील नाईट क्लब मध्ये आढळले 22 तरुणांचे मृतदेह, पालकांंमध्ये मोठी खळबळ

दैनिक गोमन्तक

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील पूर्व लंडन शहरातील टाऊनशिपमधील नाईट क्लबमध्ये रविवारी किमान 17 तरुण मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी ही माहिती माध्यमांना दिली. प्रांतीय पोलिस प्रवक्ते ब्रिगेडियर थेंबिंकोसी किनाना यांनी एएफपीला सांगितले की, "पूर्व लंडनमधील सीनरी पार्कमधील स्थानिक क्लबमध्ये मरण पावलेल्या 22 लोकांबद्दलचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. आम्ही अजूनही घटनेच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करत आहोत. पीडितांचे वय 18 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे." (South Africa)

घटनास्थळी असलेले ईस्टर्न केप प्रांतीय समुदाय आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी उन्टी बिंकोस यांनी चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता नाकारली. ही चेंगराचेंगरी आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण मृतांच्या जखमा उघड्या दिसत नाहीत, असे बिन्कोसने एएफपीला सांगितले.

डिस्पॅचलाइव्ह या प्रादेशिक स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हे मृतदेह टेबल, खुर्च्या आणि जमिनीवर विखुरलेले पडले होते. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसत नाही आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्लबच्या मजल्यावर पडलेले मृतदेह दिसत आहे. ज्यावर कोणत्याही जखमांच्या खुणा दिसत नाही.

हिंद महासागरातील जोहान्सबर्गच्या दक्षिणेस सुमारे 1,000 किलोमीटर (620 मैल) अंतरावर असलेल्या शहरातील एका क्लबच्या बाहेर पालकांटी गर्दी जमली आहे. या जमलेल्या पालकांच्या आणि लोकांच्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिस अधिकारी करत आहे.हा क्लब एका समुद्रकिनार्यावर वसलेला आहे.

दरम्यान नाईट क्लबच्या बाहेर जमलेल्या लोकांमुळे एकच गोंधळ उडाला आहे. ज्या पालकांची मुले घरी पोहचले नाहीत त्यांची गर्दी या क्लबच्या बाहेर बघायला मिळत आहे. हे सगळे मुल पेन डाऊन सेलिब्रेट करत होते. ही एक अशी पार्टी होती जी परीक्षा दिल्यानंतर किंवा संपल्यानंतर विद्यार्थी मिळून सेलिब्रेट करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT