पाकिस्तानचं पाखंड, 26/11च्या मास्टर माईंडचा मृत्यू खोटा-नाटा

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे.
Taj Hotel
Taj HotelDainik Gomantak

Mumbai Terror Attacks: 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. यापूर्वी, एफबीआयने मोस्ट वाँटेड घोषित केलेल्या साजिदच्या मृत्यूचा दावा पाकिस्तानी गुप्तचर संस्था असणाऱ्या आयएसआयने केला होता. तज्ज्ञांच्या मते, FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने मीरला शिक्षा करण्याचे नाटक केले आहे. (Pakistan 26 11 Mumbai attack mastermind Sajid Mir is alive)

निक्केई एशियाच्या अहवालानुसार, एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मीर जिवंत आहे, तो पाकिस्तानात कोठडीत असून त्याला शिक्षा झाली आहे. 2011 मध्ये, FBI ने मीरला मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केले होते. अमेरिका आणि भारत दशकभरापासून त्याचा शोध घेत आहेत. लष्कराचा म्होरक्या हाफिज सईदचा (Hafiz Saeed) निकवर्तीय साजिद हा मुंबई (Mumbai) हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली आणि इतर दहशतवाद्यांचा हस्तक असल्याचे मानले जाते.

Taj Hotel
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

पाकिस्तानचा खरा हेतू

साजिद मीरच्या अटकेने पाकिस्तानला (Pakistan) दाखवायचे आहे की, तो दहशतवादाविरोधात काम करतोय. या अटकेला FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची योजना म्हटले जात आहे. पाकिस्तान जून 2018 पासून FATF च्या ग्रे लिस्टमध्ये आहे. यावेळी जर्मनीमध्ये झालेल्या बैठकीत FATF ने ग्राउंड चाचण्या घेतल्यानंतर पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. अशा परिस्थितीत पाकिस्तान दहशतवादाविरोधात उघडपणे काम करत असल्याचे दाखवू इच्छित आहे.

Taj Hotel
''पाकिस्तान कर्जात बुडाला'': पंतप्रधान शाहबाज शरीफ

साजिद हा लख्वीचा सुरक्षा प्रमुख होता

साजिद मीर 2010 पर्यंत लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) ऑपरेशन प्रमुख झकी-उर-रहमान लख्वीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होता. त्याने परदेशात दहशतवाद्यांची भरती तर केलीच पण पाकिस्तानात दहशतवादी तळही चालवले. आयएसआयच्या इंडियन मुजाहिदीन ऑपरेशनमध्येही तो सहभागी होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com