Pakistan  Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये 2 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण जाणून घ्या

दोघांवर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांमध्ये देशद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

Pramod Yadav

Pakistan: पाकिस्तानी लष्कराने कोर्ट मार्शलनंतर आपल्या दोन निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी लष्कराने या दोन माजी अधिकाऱ्यांना 12 आणि 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मेजर (निवृत्त) आदिल फारुक राजा आणि कॅप्टन (निवृत्त) हैदर रझा मेहंदी अशी पाकिस्तानी लष्कराने शिक्षा सुनावलेल्या दोन माजी अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोघांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेमुळे 9 मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचारातील आरोपींच्या खटल्यांची सुनावणी सुरू झाली आहे.

मेजर (निवृत्त) आदिल फारुख राजा आणि कॅप्टन (निवृत्त) हैदर रझा मेहंदी हे दोघेही आरोपी परदेशात राहतात. हे दोघेही पाकिस्तानी लष्कराच्या सध्याच्या वरिष्ठ नेतृत्वाचे 'विरोधक' मानले जातात. कोर्ट मार्शलवेळी दोघेही हजर नव्हते.

दोघांनाही पाकिस्तान आर्मी अॅक्ट, 1952 च्या फील्ड जनरल कोर्ट मार्शल (FGCM) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांवर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांमध्ये देशद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे, असे पाकिस्तानी लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.

दोघांनीही ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. ही तरतूद हेरगिरी आणि पाकिस्तानच्या सुरक्षेशी आणि हिताशी संबंधित आहे. मेजर राजाला 14 वर्षांची सश्रम कारावासाची तर कॅप्टन मेहंदीला 12 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

स्थानिक मीडियानुसार, पाकिस्तानी लष्कराचे हे दोन्ही माजी अधिकारी - मेजर (निवृत्त) आदिल फारूक राजा आणि कॅप्टन (निवृत्त) हैदर रझा मेहंदी - पाकिस्तानबाहेर राहतात. त्यामुळे त्यांना शिक्षा भोगण्यास भाग पाडणे पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कराला अवघड जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ही, बोरी पुलाबाबत लोकांची दिशाभूल तर नव्हे?

Goa Beach Problems: 'किनारी भागात हप्ते हजारांऐवजी द्यावे लागतात लाखांमध्ये'! पालेकरांचा आरोप; 'राजकीय बॉस' शोधण्याची केली मागणी

Pirna: चेहऱ्यावर जखमा, लाथाबुक्क्यांनी मारहाणीच्या खुणा! 'पीर्ण' प्रकरणातील गूढ वाढले; खुनाचा गुन्हा नोंद

Aishwarya Rai Controversy: बॉलिवूडची 'ब्यूटी क्वीन' आणि वाद! घटस्फोटाच्या अफवांपासून ते सलमानसोबतच्या नात्यापर्यंत... ऐश्वर्याच्या आयुष्यातील 6 सर्वात मोठे वाद

Ranji Trophy: गोव्यासमोर पंजाबचे कडवे आव्हान! हुकमी फलंदाज 'सुयश'च्या कामगिरीवर लक्ष; संघात पुन्हा धाकड अष्टपैलूची वापसी

SCROLL FOR NEXT