Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Blast In Mosque: अफगाणिस्तानात भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक लोक जखमी

Blast In Mosque: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Manish Jadhav

Blast In Mosque: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या स्फोटात एका प्रमुख मौलवीचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील पीडी 17 भागात असलेल्या सिद्दिकिया मशिदीमध्ये हा स्फोट झाला. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

घटनास्थळी मदतकार्य सुरु असून सुरक्षा दलांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचेही त्यांनी सांगितले. जखमींपैकी काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

तालिबानचा ताबा मिळून एक वर्ष

तालिबानला अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता मिळवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत आधीच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशात बॉम्बस्फोटांचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या गुरुवारी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तालिबानचा एक प्रमुख नेता ठार झाला होता. रहिमुल्लाह हक्कानी असे ठार झालेल्या तालिबान म्होरक्याचे नाव आहे.

मौलवीच्या मृत्यूची बातमी

स्फोटाबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघाती हल्ला होता. या स्फोटात मौलवी मुल्ला अमीर मोहम्मद काबुली यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

परिसरात उपस्थित असलेल्या रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 27 लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्यात पाच मुलांचाही समावेश आहे.

तालिबानचे (Taliban) प्रवक्ते खालेद झद्रान यांनी काबूलमधील मशिदीमध्ये स्फोट झाल्याची पुष्टी केली, परंतु मृत किंवा जखमींबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. तालिबानने जारी केलेल्या निवेदनात या स्फोटाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT