Adpai Miravnuk|Rally  Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Goa Ganesh Festival: आडपईमधील भव्य मिरवणूकीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर

Goa Ganesh Festival: चित्ररथांसह गणेशमूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Festival: अंत्रुज महालातील आडपई (Adpai) गावातील प्रसिद्ध पाच दिवसांचा एकत्रित कुटुंबीयांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. कोविड महामारीच्या काळानंतर प्रथमच यंदा भाविकांनी आज, रविवारी विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी केली होती. यावेळी चित्ररथांसह गणेशमूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. आडपई गावातील विविध कुटुंबीयांचा एकत्रित गणेशोत्सव आणि पाच दिवसानंतर होणारी विसर्जन मिरवणूक भाविकांसाठी अपूर्व पर्वणी असते.

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशा गजरात भाविकांनी चित्ररथांसह मिरवणूक काढली. या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते. राज्यात विविध ठिकाणी नोकरी-व्यवसायासाठी गेलेले आडपई गावातील लोक यावेळी एकत्रित येतात. येथील दत्त मंदिराजवळ एकत्रित आल्यानंतर नाचत गात रात्री उशिरा श्रींचे विसर्जन (Visarjan) करण्यात आले.

सांत आंद्रे (St Andre) मतदारसंघाचे आमदार वीरेश बोरकर यांनी आडपईतील गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते. येथील नाईक कुटुंबीयांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत वीरेश बोरकर सहभागी झाले होते. जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक हेही सहभागी झाले होते.

श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री-

कोविड महामारीनंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात भाविकांनी मिरवणूक काढली. भाविकांचा हा उत्साह पाहण्यासारखा असून या उत्सवासाठी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा.

ॲड. नरेंद्र सावईकर, माजी खासदार-

आडपईचा गणेशोत्सव भाविकांसाठी अपूर्व अशी पर्वणी घेऊन येतो. या विसर्जन मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. गणराया सर्वांना चांगली बुद्धी देवो.

प्रदीप शेट, उद्योजक-

कोविड महामारीनंतर प्रथमच भाविकांनी मोठ्या उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा केला आहे. ही चतुर्थी खऱ्या अर्थाने चैतन्यमय ठरली. आडपईतील कलाकारांमुळे या विसर्जन मिरवणुकीत चित्ररथ पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT