Bicholim News: डिचोलीत पाच दिवसांच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन

रविवारी रात्री उशिरा गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन
Ganapati immersed faithfully
Ganapati immersed faithfullyDainik Gomantak

डिचोली: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी गणरायापाशी विनवणी, ''मंगलमूर्ती मोरया' आदी जयघोष आणि गणेशभक्तांच्या साक्षीत डिचोलीत विविध भागात रविवारी रात्री उशिरा पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन करण्यात आले.गेल्या चार दिवसांप्रमाणे रविवारी पावसानेही कृपा केल्याने गणपती विसर्जन सुरळीत पार पडले.

(five-day Ganapati immersed faithfully at Bicholim)

Ganapati immersed faithfully
केळबाय कुर्टीचा माटोळीतील 'वराह अवतार' ठरतोय आकर्षणाचे केंद्र

सर्वणसह, कारापूर, लाडफे, मुळगाव, मये आदी बहूतेक भागात दरवर्षी पाच दिवस चतुर्थी साजरी करण्यात येते.सायंकाळी उत्तरपूजा झाल्यानंतर घरोघरी फुगड्यांसह आरत्यांचा निनाद सुरु झाला. काळोख पडताच गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीवेळी मंगलमूर्तीच्या जयघोषासह "बाप्पा चालले आपुल्या गावाला" हे स्वरही कानी पडत होते.

Ganapati immersed faithfully
बॅसिलिका ऑफ बॉम जिझस महिनाभरासाठी राहणार बंद

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी महिलांसह लहान मुलेही पुढे होती. त्या-त्या भागात पारंपरिक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन करून गणेशभक्तांनी बाप्पाला उत्साही निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन कार्यक्रम सुरु होता. गणपती बाप्पाला निरोप देताना लहान मुलांच्या चेहऱ्यावर मात्र स्पष्ट निराशा दिसून येत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com