Yuzvendra Chahal And Dhanashree Divorce Dainik Gomantak
देश

Yuzvendra Chahal And Dhanashree Varma Divorce: अखेर चहल-धनश्रीचं नातं तुटलं; चार वर्षांत मोडला 'संसार', घटस्फोटाचं कारण काय?

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma: टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे.

Sameer Amunekar

टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. बऱ्याच काळापासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. चहल आणि धनश्री यांनी इंस्टाग्रामवरही एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाबद्दल अटकळ सुरू झाली होती.

युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा कायदेशीररीत्या वेगळे झाले आहेत. म्हणजेच त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत होत होत्या. मात्र आता दोघांनीही घटस्फोट घेतला आहे.

न्यायालयात घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान, चहल आणि धनश्री वर्मा यांनी सांगितलं की ते दोघेही १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. दरम्यान, दोघांच्याही अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत होते.

घटस्फोटाचे नेमकं कारण काय?

चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाचे कारणही समोर आलं आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आलं की दोघांमध्ये पटत नाही. ज्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता चहल आणि धनश्री कायदेशीररित्या पती-पत्नी नाहीत.

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी २०२० मध्ये एकमेकांशी लग्न केले होते, परंतु आता ४ वर्षांच्या लग्नानंतर दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही गुरुग्राममध्ये काही जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT