देश

Har Ghar Tiranga: योगींच्या युपीत युवकाने घरी फडकवला पाकिस्तानी झेंडा

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्याला येत्या 15 ऑगस्टला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून हर घर तिरंगा आणि अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश मधील कुशीनगर येथे एका युवकाने आपल्या घरी चक्क पाकिस्तानी झेंडा फडवला आहे. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून, पाकिस्तानी झेंडा खाली उतरवला आहे.

कुशीनगर येथील बेंदुपार मुस्तकील गावातील युवकाने आपल्या घराच्या छतावर पाकिस्तानी झेंडा फडकवला. युवकाला अनेकांनी विरोध केला मात्र, विरोध झुगारून घरावर पाकिस्तानी झेंडा फडकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी तात्काळ घटेनेचे दखल घेत. घटनास्थळी जात युवकाला ताब्यात घेतले व झेंडा खाली उतरवला आहे.

युवकाला त्याच्या घरच्यांनी देखील विरोध केला होता, मात्र या विरोधाला न जुमानता त्याने पाकिस्तानी झेंडा फडकवला. व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या युवकाचे नाव सलमान असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत हर घर तिरंगा ही मोहिम राबविली जात आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाला घरोघरी तिरंगा फडकवता येणार आहे. त्यात कट्टर हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असलेल्या योगींच्या उत्तर प्रदेशमधून अशी घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT