Crime News Dainik Gomantak
देश

हाफ 50 हजार तर फुल मर्डरसाठी एक लाख रुपये, हत्येची सुपारी घेण्यासाठी छापले चक्क पोस्टर आणि व्हिजिटिंग कार्ड

West Bengal Crime: गुन्हेगार आपला गुन्हा लपवतात. एखादा गुन्हा करायचाच असेल तर ते गुपचूप करतात, जेणेकरुन कुणालाही कळू नये.

Manish Jadhav

West Bengal Crime: गुन्हेगार आपला गुन्हा लपवतात. एखादा गुन्हा करायचाच असेल तर ते गुपचूप करतात, जेणेकरुन कुणालाही कळू नये. खून असो, चोरी असो की मग दरोडा, एखाद्या गुन्हेगाराने खुनाची सुपारी मागणारे पोस्टर लावल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कॅनिंगमध्ये एक पोस्टर आणि व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल पोस्टरमध्ये आरोपीने हाप मर्डरसाठी (हत्येचा प्रयत्न) 50 हजार रुपये आणि हत्येसाठी 1 लाख रुपये असे लिहिले आहे.

दरम्यान, पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गेल्या सोमवारी आरोपीला अटक केली. बुलेट उर्फ ​​मोर्सेलिम मोल्ला असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी बुलेटला न्यायालयात हजर केले, तेथून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याचे पोस्टर्स आणि व्हिजिटिंग कार्ड छापले होते. मात्र, आम्हाला हे कळताच आम्ही तातडीने कारवाई केली.

पोस्टरमध्ये आरोपीने लिहिले होते की, “हाप मर्डरसाठी 50 हजार रुपये आणि मर्डरसाठी 1 लाख रुपये.'' आरोपीने (Accused) पोस्टरमध्ये आपला मोबाईल नंबर आणि फोटोही दिला होता.

आरोपी तरुणाला यापूर्वीच अटक करण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार, बुलेट उर्फ ​​मोर्सेलिम मोल्लाला ऑगस्ट 2022 मध्ये अवैध शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती.

याशिवाय, 7 जुलै 2021 रोजी गोपाळपूर पंचायतीच्या बंधुकुलातील धर्मतळा गावात पंचायत सदस्य स्वपन माझी यांच्यासह तिघांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये बुलेट उर्फ ​​मोर्सेलिम मोल्लाचे नावही समोर आले आहे.

आरोपीकडे बंगाली भाषेत छापलेली पोस्टर्स आणि व्हिजिटिंग कार्ड मिळाले

आरोपी ​​मोर्सेलिम हा या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रफीकुल सरदार याचा पुतण्या आहे. या घटनेत बुलेटलाही अटक करण्यात आली होती, मात्र तो अल्पवयीन निघाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची कसून चौकशी केली जात असून या घटनेशी आणखी कोणाचा संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, बुलेट उर्फ ​​मोर्सेलिम हा कॅनिंग पोलिस (Police) स्टेशन हद्दीतील धर्मतळा चौकात असलेल्या दुकानातून व्हिजिटिंग कार्ड छापून आणायचा. मात्र, दुकान मालक झहीर मिस्त्री यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी असे कोणतेही कार्ड किंवा पोस्टर छापले नाही.

आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

सोमवारी कॅनिंगच्या गोपाळपूर पंचायतीच्या धर्मतळा गावात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. त्याचवेळी आरोपी बुलेट उर्फ ​​मोर्सेलीम मोल्ला याला अटक करण्यात आली.

याशिवाय पोलिसांनी आरोपीच्या (Accused) घरातून एक बंदूक, काडतुसे आणि अनेक व्हिजिटिंग कार्डेही जप्त केली आहेत. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सध्या बुलेट उर्फ ​​मोर्सेलीम याच्या पोलिस कोठडीला तीन दिवस झाले आहेत. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

SCROLL FOR NEXT