
West Bengal News: सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लोक व्यक्त होण्यासाठी, रिल्स बनवण्यासाठी त्याचबरोबर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत आहेत. मात्र पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
लोकांना रील्स बनवण्याचे इतके वेड लागले आहे की, त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार आहेत. महागडा आयफोन घेण्यासाठी एका आईने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला विकले. तिला फोनवरुन रील बनवायचे होते.
हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. सध्या पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, आईलाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, हे जोडपे पाणिहाटी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला रील बनवण्यासाठी अनेक ठिकाणी फिरत होती, यामुळे लोकांचा संशयही बळावला. शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर अनेक दिवसांपासून मुल बेपत्ता असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी या महिलेला (Women) तुझे मूल कुठे आहे, असे विचारले, असता तिने सांगण्यास टाळाटाळ केली.
दुसरीकडे, पोलिस आरोपी महिलेची चौकशी करत आहेत. त्याचवेळी, खर्डा येथील एका महिलेच्या हातून एका बालकाचीही सुटका करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी मीडियासमोर काहीही बोलण्यास नकार दिला.
खर्डा ठाणेदाराच्या म्हणण्यानुसार, तपास थोडा पुढे जाईपर्यंत याबाबत काहीही सांगता येणार नाही. दरम्यान, आरोपी महिलेने पैशासाठी दुसऱ्या जोडप्याला मुल विकल्याचे कबुल केले आहे.
तसेच, आरोपी (Accused) महिला पती जयदेवसह सासऱ्याबरोबर अनेक दिवसांपासून पाणिहाटी गांधीनगर येथे राहत आहे. जयदेव आणि त्याची पत्नी साथीला सात वर्षांची मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा आहे. शनिवारी सासऱ्याचे सुनेशी काही कारणावरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन ते पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांनी सासू आणि सासऱ्याला अटक केली. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर मूल दिसले नाही. त्याच दरम्यान, अचानक आरोपी महिलेकडे एक महागडा मोबाईल आला. शेजाऱ्यांनी या जोडप्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचाही आरोप केला.
स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले की, “मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जयदेवला अटक केली.''
ते पुढे म्हणाले की, पोलिसांना बेपत्ता झालेले आठ महिन्यांचे मूल सापडले आहे. प्रियंका घोष यांनी मुलाला विकत घेतले होते. मुलाची सुटका करण्यासोबतच प्रियांकालाही अटक करण्यात आली आहे. गरिबीमुळे मुलाची विक्री केली होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस आता करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.