Yogi Adityanath oath ceremony news, UP CM oath ceremony news 
देश

योगी आदित्यनाथांचा आज शपथविधी; उपमुख्यमंत्री पदावरून 'सस्पेन्स' कायम

भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाची घोषणा झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

योगी आदित्यनाथ शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्ता हाती घेणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. गुरुवारी, भाजपच्या विधिमंडळ पक्षाने योगी यांची नेता म्हणून एकमताने निवड केली. यानंतर योगींनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा मांडला. त्यांनी योगींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. शुक्रवारी दुपारी 4 वाजता अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एका भव्य समारंभात योगी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. (Yogi Adityanath oath ceremony news)

भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीसाठी एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक केंद्रीय निरीक्षक गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), सहनिरीक्षक राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे पार पडली. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुरेश खन्ना यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

उपमुख्यमंत्र्यांवर सस्पेन्स कायम
भाजपच्या (BJP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाची घोषणा झालेली नाही. 2017 मध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून केशव प्रसाद मौर्य आणि डॉ.दिनेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाच्या घोषणेबाबत अटकळ बांधली जात होती, मात्र पक्षाने सस्पेन्स कायम ठेवला आहे.

जेव्हा योगी भावूक झाले...
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आमदारांना संबोधित करताना भावूक झाले. योगी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपने पाच वर्षे राज्यात सरकारच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी दिली. राज्यात प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT