'यूट्यूबवर अपलोड करा, मोफत होईल'; 'द काश्मीर फाइल्स' वरुन केजरीवाल आक्रमक

दिल्लीत 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीसाठी दिल्लीचे भाजप आमदार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आमनेसामने आले आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

The Kashmir Files: दिल्लीत 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीसाठी दिल्लीचे भाजप (BJP) आमदार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आमनेसामने आले आहेत. दिल्लीत (Delhi) चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीला उत्तर देताना केजरीवाल विधानसभेत म्हणाले की, "युट्यूबवर चित्रपट अपलोड करा.'' विधानसभेत भाषण करताना केजरीवाल म्हणाले, 'ते 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) करमुक्त करा म्हणत आहेत. यूट्यूबवर टाका, ते विनामूल्य असेल. ते पुढे म्हणाले, 'तुम्ही आम्हाला हा चित्रपट करमुक्त करण्यास का सांगत आहात? जर तुम्हाला स्वारस्य असेल तर विवेक अग्निहोत्री (Director Film) यांना YouTube वर टाकण्यास सांगा, तिथे विनामूल्य होईल.' (Arvind Kejriwal responds to BJP MLA's demand for tax exemption for The Kashmir Files in Delhi)

Arvind Kejriwal
...म्हणून तिने रक्ताने बनवली 'द काश्मीर फाइल्स'ची पेंटिंग

दरम्यान, उत्तरप्रदेश, त्रिपुरा, गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडसह बहुतांश भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या संवेदनशील विषयावर आधारित आहे. केजरीवाल यांच्या उत्तरावर टिप्पणी करताना, भाजप नेते बीएल संतोष म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 'निल बटे सन्नाटा' आणि 'सांड की आँख' चित्रपट करमुक्त केले होते. विशेष म्हणजे दिल्लीकरांना ते पाहण्याचे देखील आवाहन केले होते.'' संतोष यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्रींना 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यास सांगितले आहे... कर सवलत का? हे इतर चित्रपटांना का लागू होत नाही... लाज वाटते..'

शिवाय, 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट 11 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com