Yogi Adityanath 
देश

योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

भाजप सरकारचा (BJP Government) दुसरा शपथविधी सोहळा 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता शहीद पॅड येथील एकना स्टेडियमवर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा (BJP Government) दुसरा शपथविधी सोहळा 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता शहीद पॅड येथील एकना स्टेडियमवर होणार आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी यांच्यासह उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 21 किंवा 22 मार्च रोजी एकना स्टेडियमवर प्रस्तावित शपथविधी सोहळ्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. (Yogi Adityanath to be sworn in as CM on March 25)

दरम्यान, योगी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बसपा सुप्रीमो मायावती, सपाचे सुप्रिमो मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. माहिती विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी सांगितले की, 'शपथविधी सोहळा एकना स्टेडियमवर होणार आहे.'

या समारंभात लाभार्थींचाही सहभाग असणार

योगी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. लखनऊसह जवळपासच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आणले जाईल. विशेषत: महिला लाभार्थींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT