'बुलडोजर रिटर्न' भाऊ योगी आदित्यनाथ यांच्या विजयावरती बहीण शशीची प्रतिक्रिया

योगी आदित्यनाथ यांच्या जबरदस्त विजयानंतर, उत्तराखंडमधील त्यांच्या घर आणि गावासह त्यांच्या नातेवाईकांमध्ये सध्या आनंदाची लाट आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या जबरदस्त विजयानंतर, उत्तराखंडमधील त्यांच्या घर आणि गावासह त्यांच्या नातेवाईकांमध्ये सध्या आनंदाची लाट आहे. योगींच्या मोठ्या बहिणीशी माध्यमांनी खास बातचीत केली. ज्यामध्ये त्यांनी सीएम योगी यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण शशी त्यांचे गाव उत्तराखंडच्या पौरी गढवालमध्ये आहे. (Sister Shashi's reaction to brother Yogi Adityanath's victory as Chief Minister)

Yogi Adityanath
कोण होणार भारताचा पुढील राष्ट्रपती? विधानसभा निवडणुकांनंतर चर्चेला उधाण

शशी नीलकंठ मंदिराजवळ प्रसाद, खाद्यपदार्थांचे दुकान चालवतात. त्याच बरोबर आपला धाकटा भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाल्याच्या आनंद गगनात मावेना. त्याचवेळी त्यांना त्यांचे भाऊ भेटायला येतात की नाही, या प्रश्नावर सीएम योगी यांचे मेहुणे पूरण सिंह पायल म्हणाले की, 'मुख्यमंत्री योगींना कोठारला यायला वेळ मिळत नाही, पण त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ जी शाळेता यांच्या मूर्तीच्या अनावरणामुळे गावात येण्याची शक्यता आहे.

वयाच्या 22 व्या वर्षी सोडले घर

ते म्हणाले की योगी यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच घर सोडले. घरीच नाही तर अजय सिंह बिश्त नाव सोडून त्यांनी गोरखनाथ मठात दीक्षा घेतली आणि तेव्हापासून योगी आदित्यनाथ झाले आहेत. योगी यांचे मेहुणे पूरण सिंह पायल सांगतात की योगी यांचे मन कधीही घरच्या कामांमध्ये गुंतले नाही.

Yogi Adityanath
गोवा: TMC साठी नवीन पहाट आणण्यात प्रशांत किशोर अपयशी

नातेवाईकांशी बोलता येत नाही

जेथे यूपी (Uttar Pradesh) निवडणुकीत कुटुंबवादाचा महत्त्वाचा भाग होता, त्याचवेळी सीएम योगी यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कामामुळे सीएम योगी यांच्यासोबत कुटुंबीय आणि नातेवाईकांची चर्चाही शक्य नाहीये. सीएम योगी यांच्या बहिणीने सांगितले की, मात्र त्यानंतरही या कुटुंबाला कोणताही पश्चाताप नाही कारण योगी कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे प्रमुख बनले, आता कुटुंबाच्या आशा आणखी वाढल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com