Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

3 महिने मोफत रेशन, यूपीच्या 15 कोटी जनतेला योगी सरकारची पहिली भेट

योगी सरकारच्या या निर्णयामुळे थेट 15 कोटी लोकांचे बदलणार जीवन

दैनिक गोमन्तक

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील (UP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील 15 कोटी जनतेला आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या बैठकीत पुढील 3 महिने मोफत रेशन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या योजनेची घोषणा केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही मोफत रेशन योजनेला आणखी तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 15 कोटी लोकांना होणार आहे. ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती.

त्याचवेळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले. उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले की, या निर्णयामुळे थेट 15 कोटी लोकांचे जीवन बदलेल. त्याचवेळी ब्रिजेश पाठक म्हणाले की, सरकार सातत्याने गरिबांची काळजी घेत असून त्याचा थेट लाभ करोडो कुटुंबांना मिळणार आहे.

कॅबिनेट बैठकीपूर्वी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री संदीप सिंह म्हणाले होते की, आज योगी 2.0 ची पहिली कॅबिनेट बैठक घेणार आहे आणि आजच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे आणि विभागांच्या वितरणावरही चर्चा होऊ शकते.

शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी एकना स्टेडियमवर पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व बडे नेते उपस्थित होते. योगी मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 53 दिग्गज नेते आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील अनेक समज मोडीत काढत योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची कमान हाती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; विराट कोहलीचा रेकॉर्ड 'फ्लॉप', पण रोहित शर्मा सर्वात यशस्वी फलंदाज!

Viral Video: 'पापी पोटासाठी' जीवघेणा खेळ! अंगावर फटाक्यांची माळ बांधून तरुणाचा स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: शाहिद आफ्रिदीचा 10 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! 'हिटमॅन' ठरणार वनडेचा सिक्सर किंग; मारावे लागणार फक्त 'इतके' षटकार

SCROLL FOR NEXT