योगी सरकार 2.0 ला प्रोफेशनल टच; IAS, IPS ते डॉक्टर, इंजिनीअर, वकील बनले मंत्री

योगी सरकारने (Yogi Government) शपथ घेऊन दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली आहे. नव्या सरकारमध्ये 52 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Yogi Adityanath
Yogi Adityanath Dainik Gomantak

योगी सरकारने शपथ घेऊन दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली आहे. नव्या सरकारमध्ये 52 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 18 कॅबिनेट, 12 स्वतंत्र प्रभार आणि 20 राज्यमंत्री करण्यात आले आहेत. यामध्ये अशा आठ मंत्र्यांचा समावेश आहे, जे पूर्णपणे व्यावसायिक आहेत. माजी नोकरशहांव्यतिरिक्त यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए आणि वकील यांचा समावेश आहे. यामध्ये ब्रिजेश पाठक उपमुख्यमंत्री, बेबी राणी मौर्य, जितिन प्रसाद आणि अरविंद कुमार शर्मा कॅबिनेट मंत्री, माजी आयपीएस असीम अरुण, दयाशंकर मिश्रा दयालू, राज्य-स्वतंत्र प्रभार मंत्री, तर अजित पाल सिंग आणि दानिश आझाद यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. (Apart from bureaucrats Yogi Adityanath's cabinet includes doctors engineers MBAs and lawyers)

दरम्यान, योगी सरकारमध्ये (Yogi Government) यावेळी व्यावसायिक अनुभव असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाईल असंही सांगण्यात येत होते. यामध्ये जातीय समीकरणांव्यतिरिक्त शैक्षणिक पार्श्वभूमी आणि विषय तज्ञांनाही प्राधान्य दिले जाईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सकारात्मकता आणणे गरजेची असल्याचे देखील सांगण्यात आले होते. यूपीच्या 80 लोकसभा जागांवर विजय मिळवणे हे भाजपचे अंतिम उद्दिष्ट आहे.

Yogi Adityanath
योगी सरकार 2.0: योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

योगी सरकार 2.0 मध्ये कोणत्या व्यावसायिकांना मंत्री करण्यात आले आहे ते सांगूया…

1. ब्रिजेश पाठक: यूपीच्या दुसऱ्या योगी सरकारमध्ये ब्रिजेश पाठक उपमुख्यमंत्री बनले आहेत. ब्रिजेश जवळपास दोन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. यापूर्वी ते बसपमध्ये होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते व्यावसायाने वकील आहेत. विशेष म्हणजे ते जातीच्या निकषातही बसतात. यापूर्वीच्या योगी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते.

2. बेबी राणी मौर्य: बेबी राणी मौर्या उत्तराखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. त्यांना राज्यपालपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्या यूपीच्या राजकारणात सक्रिय झाल्या. जवळपास दोन दशकांपासून त्या भाजपमध्ये सक्रिय आहेत. 2002 ते 2005 या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याही होत्या. त्यांनी बीएड, एमए असे उच्च शिक्षणही घेतले आहे. जातीव्यतिरिक्त त्यांनी शैक्षणिक पार्श्वभूमीचे निकषही पूर्ण केले आहेत. या सर्व कारणांमुळे त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.

Yogi Adityanath
योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

3. जितिन प्रसाद: जितिन प्रसाद हे एकेकाळी राहुल गांधींच्या खूप जवळचे होते. ते ही ब्राह्मण चेहरा आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना यूपी सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते. ते यूपीए सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांनी एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे. एकापाठोपाठ त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.

4. अरविंद कुमार शर्मा: ए. के शर्मा हे गुजरात केडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते 2014 पर्यंत शर्मा त्यांचे सचिव होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एके शर्माही केंद्रात आले. त्यांनी पीएमओमध्येही आपली सेवा दिली. शर्मा हे गेल्या 20 वर्षांपासून पंतप्रधान मोदींच्या विश्वासू लोकांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी ते व्हीआरएससह भाजपमध्ये दाखल झाले, एमएलसी झाले. जून 2021 मध्ये त्यांना यूपी भाजपचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. त्यावेळी निवडणुकीपूर्वी त्यांचा यूपीच्या मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी बरीच चर्चा झाली होती. परंतु नंतर तसे होऊ शकले नाही. ते मूळचे मऊ जिल्ह्यातील आहे.

Yogi Adityanath
CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितले मुस्लिमांना तिकीट न देण्यामागचे कारण

5. असीम अरुण: IPS असीम अरुण, कानपूरचे माजी पोलीस आयुक्त, यांनी देखील NSG मधून कमांडो प्रशिक्षण घेतले आहे. 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरुण हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एसपीजी सुरक्षेतही होते. यूपीमध्ये आमदार झाल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार देऊन राज्यमंत्री करण्यात आले आहे. असीम यांना काम करण्याचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. आणि दुसरे म्हणजे ते दलित समाजातून येतात.

6. दयाशंकर मिश्रा 'दयाळू': दयाशंकर मिश्रा हे गाझीपूरमधील सिधोनाचे रहिवासी आहेत. वाराणसीतून बीएस्सी, एमएससी केल्यानंतर त्यांनी वनस्पतिशास्त्रात पीएचडी केली. ते डीएव्ही कॉलेजचे प्राचार्य होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे.

Yogi Adityanath
पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते भगवंत मान यांनी घेतली शपथ

7. अजित पाल सिंह: कानपूर देहाटच्या सिकंदरा मतदारसंघाचे आमदार अजित पाल सिंह यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कानपूरमधून झाले. त्यांनी रशियाला जाऊन बीटेक, एमटेक आणि एमबीए केले. हैदराबादमध्ये केमिकल इंजिनीअर म्हणून 3 वर्षे काम केले. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियालाही गेले. तिथे त्यांनी 10 वर्षे काम केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा योगी सरकारला मिळणार आहे.

8. दानिश आझाद: योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये दानिश आझाद हे एकमेव मुस्लिम मंत्री बनले आहेत. दानिश आझाद अन्सारी हा मूळचा बलिया येथील बसंतपूरचा आहे. त्यांनी 2006 मध्ये लखनऊ विद्यापीठातून बी.कॉम पूर्ण केले. यानंतर, येथून त्यांनी मास्टर ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट आणि नंतर मास्टर ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा कोर्स केला. जानेवारी 2011 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले, जी भाजपची विद्यार्थी शाखा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com