Yasin Malik
Yasin Malik  Dainik Gomantak
देश

Yasin Malik Hunger Strike: फुटीरतावादी नेता यासिन मलिकचे तिहार तुरुंगात उपोषण; सरकारकडे मोठी मागणी

दैनिक गोमन्तक

Yasin Malik Hunger Strike: दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (Jammu and Kashmir Liberation Front) प्रमुख यासिन मलिक (Yasin Malik) तुरुंगातच उपोषणाला बसला आहे. अतिरेकी यासीन मलिकचे म्हणणे आहे की, त्याच्या विचाराधीन असलेल्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने तो उपोषणाला बसला आहे. यासीन मलिकयाशी बोलण्यासाठी तुरुंगातील वरिष्ठ अधिकारीही आले मात्र त्याने उपोषण सोडण्यास नकार दिला.

13 जुलै रोजी, मलिकने माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणाशी संबंधित प्रकरणातील साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी दिल्लीतील विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी न मिळाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे मलिकने सांगितले. मलिक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर झाला. आपण सरकारला पत्र लिहून न्यायालयात हजर राहण्याची परवानगी मागितली असल्याचे मलिकने सांगितले.

हे प्रकरण 8 डिसेंबर 1989 रोजी रुबिया सईदच्या अपहरणाशी संबंधित आहे. त्यावेळी केंद्रात भाजप समर्थित व्हीपी सिंग सरकार होते. सरकारने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या (JKLF) पाच दहशतवाद्यांना सोडल्यानंतर अपहरणकर्त्यांनी रुबियाची सुटका केली होती.

या प्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने 25 मे रोजी काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ‘दहशतवादी’ कारवायांसाठी निधी उभारल्याबद्दल मलिकला शिक्षा सुनावण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT