पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी यासिन मलिकला पाठिंबा देत संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहून केली तक्रार

न्यायालयाने गेल्या आठवड्यात यासीनला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Bilawal Bhutto on Yasin Malik
Bilawal Bhutto on Yasin MalikDainik Gomantak

Bilawal Bhutto on Yasin Malik: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto) यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांना पत्र लिहिले आहे.

दिल्लीतील एका न्यायालयाने गेल्या आठवड्यात यासीनला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. काश्मीरमधील परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बिलावल यांनी 31 मे रोजी संयुक्त राष्ट्र प्रमुखांना पत्र पाठवले होते, असे परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

Bilawal Bhutto on Yasin Malik
पाकची वाटचाल लंकेच्या दिशेने, पेट्रोलचा दर 209 रुपये प्रति लिटरवर

बिलावल यांचे संयुक्त राष्ट्र महासचिवांना पत्र

निवेदनानुसार, बिलावलच्या पत्रात संयुक्त राष्ट्र महासचिवांना मलिकच्या शिक्षेच्या परिस्थितीबद्दल अवगत करण्यात आले होते. बिलावल यांनी पत्रात आरोप केला आहे की मलिकवरील आरोप हा काश्मिरी आणि त्यांच्या नेतृत्वाचा "छळ आणि अत्याचार" करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. मलिकच्या "कस्टडील मर्डर"ची भीतीही त्यांनी व्यक्त केली. बिलावल यांनी गुटेरेस यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संबंधित ठरावांनुसार जम्मू-काश्मीर वादाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

Bilawal Bhutto on Yasin Malik
इम्रान खान यांच्यावर चालणार देशद्रोहाचा खटला! पंतप्रधान शाहबाज शरीफ अ‍ॅक्शन मोडमध्ये

जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे. वास्तव स्वीकारून भारताविरुद्धचा अपप्रचार थांबवावा, असा सल्लाही भारताने पाकिस्तानला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com