Worlds Tallest Shiva Dainik Gomantak
देश

Worlds Tallest Shiva: जगातील सर्वात उंच शिवमूर्ती तयार; दहा वर्ष सुरू होते काम

शनिवारी होणार उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

गोमन्तक डिजिटल टीम

Worlds Tallest Shiva: जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचे काम पूर्ण झाले आहे. राजसमंद जिल्हा राजस्थान (Rajasthan) येथील नाथद्वारा येथे 369 फूट शिवमूर्ती उभारण्यात आली आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या सोहळ्यात या सर्वात उंच मूर्तीचे लोकार्पण केले जाणार आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचे मागील दहा वर्षांपासून काम सुरू होते. विश्वासाची मूर्ती म्हणून या मूर्तीला ओळखले जाईल.

The majestic statue of Lord Shiva in Nathdwara, also known as the 'Statue of Belief'

जगातील टॉप-5 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये या मूर्तीला स्थान देण्यात आले आहे. संत कृपा सनातन संस्थेने या मूर्तीच्या कामला सुरूवात केली होती. मूर्तीचा लोकार्पण सोहळा 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मूर्ती एवढी विशाल आहे की दूरवरून देखील स्पष्टपणे दिसते. तसेच मूर्तीच्या अवतीभोवती दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

2012 मध्ये जेव्हा हा पुतळा बनवण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा त्याची उंची 251 फूट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर त्याची उंची 351 फूट झाली. यानंतर भगवान महादेवाच्या केसात गंगेचा प्रवाह सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अखेर मूर्तीची उंची 369 फूट निश्चित झाली. या मूर्तीत लिफ्ट, जिने, हॉल याची सोय करण्यात आली आहे. मूर्तीसाठी 3,000 टन स्टील आणि लोखंड, तर, 2.5 लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT