Goa First: मुरगाव नगरपालिका परीसरात पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय सुरु

रोप विक्रेत्याला पालिकेने परवानगी दिली कशी?
Goa First
Goa FirstDainik Gomantak

वास्को: गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी मुरगाव नगरपालिकेच्या प्रस्तावित मुख्याधिकारी बंगल्याच्या ज्या ठिकाणी सिग्नेचर प्रकल्प येणार होता त्या ठिकाणी रोपवाटिका विक्रेत्याला पालिकेने व्यवसाय थाटण्यास दिल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.

सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाच्या जागी मुरगाव पालिका जावई पुन्हा आल्याची वास्कोत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुरगाव नगरपालिके समोरील फुटपाथवर दोन महिने ठाण मांडून बसलेल्या परप्रांतीय फुल विक्रेत्याला बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टच्या तक्रारीमुळे काढता पाय घ्यावा लागला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून मुरगाव नगरपालिकेचा जावई पुन्हा वास्कोत पालिकेच्या जागेत बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याची माहिती गोवा फर्स्टला मिळताच पालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

Goa First
Goa Mining: मायनिंग ब्लॉक्सच्या लिलावात कमालीची गुप्तता; चार ब्लॉक्ससाठी 24 कंपन्या शर्यतीत?

सद्या मुरगाव नगरपालिकेच्या जावयाने आपला फुलांची रोपे विकण्याचा व्यवसाय चक्क माजी मुख्यमंत्री स्वः मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी केलेल्या सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाच्या जागी थाटलेला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कामत सरकारने मुरगाव नगरपालिकेला तीन कोटी रुपये प्रकल्प उभारण्यासाठी दिले होते. नंतर मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या उपस्थितीत वास्को स्वतंत्रपथ मार्गाच्या बाजूस असलेल्या मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी बंगल्याच्या जागी प्रकल्पाची पायभरणी झाली होती. पण गेली 10 वर्षे प्रकल्पाचा पत्ता नसल्याची खंत नागरीकातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

Goa First
Goa Education: सांगेत बारावी परीक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी

या प्रकल्पाचे तीन कोटी रुपये देण्यात आले होते. त्या पैसाचा सुद्धा पत्ता नसल्याची चर्चा सद्या वास्कोत सुरु आहे. पुढे सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाच्या जागी पालिकेचे भंगार वाहने ठेवण्यात येत होती. पण गेल्या दोन आठवड्यापासून पालिका मुख्याधिकारी बंगल्यांच्या जागी पालिकेने आपल्या जावयाला बेकायदेशीररित्या जागा देण्यात आल्याने, बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी राज्य पालिका संचालक व मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारीकडे तक्रार दाखल केली आहे.

Goa First
Goa Mining: मायनिंग ब्लॉक्सच्या लिलावात कमालीची गुप्तता; चार ब्लॉक्ससाठी 24 कंपन्या शर्यतीत?

काय आहे नेमका प्रकार ?

वास्को येथील स्वतंत्र पथ मार्गावर बँक ऑफ बडोदा समोरील मुरगाव पालिकेच्या मालमत्तेवर अतिक्रमण केल्याबद्दल रोपवाटिका विक्रेत्याविरुद्ध गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने त्या विक्रेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी या रोपवाटिका विक्रेत्याने मुरगाव पालिकेसमोर पदपथावर अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरू केला होता.

नंतर 'गोवा फर्स्ट' तक्रारीच्या आधारे त्याला ऑगस्ट महिन्यात हाकलून लावले होते. आता याच विक्रेत्याने काही नगरसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने पालिकेचा सिग्नेचर प्रकल्पाच्या जागी अतिक्रमण केले आहे. सदर जागा केवळ सिग्नेचर प्रकल्पासाठी असून या ठिकाणी सदर विक्रेत्याला व्यवसाय करण्यास पालिकेने कशी काय परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करून गोवा फर्स्ट या विक्रेत्याला या जागेवरून तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com