World Ocean Day Dainik Gomantak
देश

World Ocean Day: किरेन रिजिजूंचा चेन्नईतील बीचवर स्वच्छता मोहिमेत सहभाग, पाहा व्हिडिओ

दरवर्षी 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा केला जातो. चेन्नई, तामिळनाडू येथील भूविज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली यावेळी विविध संघटना स्वच्छता मोहिमेअंतर्गत बेसंत नगर समुद्रकिनारी एकत्र आल्या आहेत.

Puja Bonkile

World Ocean Day: जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी चेन्नईतील बेसंत नगर बीचवरील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छताही केली. स्वच्छता अभियानादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जनतेला संदेश दिला.याचा व्हिडिओ एओनआयने ट्विटरवर शेअर केला आहे.

पत्रकारांशी बोलताना किरेन रिजिजू म्हणाले-'आम्हाला येथे फक्त समुद्रकिनारा स्वच्छ करायचा नाही तर समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी या जागतिक महासागर दिनानिमित्त लोकांना मोठा आणि स्पष्ट संदेश द्यायचा आहे.' 

  • जागतिक महासागर दिवसाचा इतिहास

जागतिक महासागर दिवस 2008 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली असून त्याची पायाभरणी 1992 मध्ये झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत करण्यात आली. कॅनडाच्या महासागर संस्था आणि कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सुरुवातीपासूनच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश महासागर वाचवण्यावर आणि महासागर संसाधनांचे कमीत कमी नुकसान करणाऱ्या पद्धती वापरण्यावर भर देण्याचा होता. 

  • यंदाची थीम

जागतिक महासागर दिवसाची थीम वेगळी असते, ज्याच्या अनुषंगाने या दिवसाची थीम 'प्लॅनेट ओशन टाइड्स आर चेंजिंग' आहे. या थीममध्ये समुद्राला विकासासाठी महत्त्वाचा विचार करून प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. 

दुसरीकडे, युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस म्हणतात की जगाने महामारी संपवून चांगल्या बांधकामासाठी काम केले आहे, त्यामुळे आता समुद्र, नैसर्गिक जग तसेच पुढील पिढीची जबाबदारी आपल्यावर आहे.      

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT