Women In Uttar Pradesh's Bareilly Beaten by In Laws for Dowry Dainik Gomantak
देश

Crime News: हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ, मारहाण करत...

Crime: शारिरीक छळासोबतच तिचा मानसिक छळही कुटुंबीयांकडून होत असल्याचा आरोप तिने केला आहे.

Ashutosh Masgaunde

Women In Uttar Pradesh's Bareilly Beaten by In Laws for Dowry:

कौटुंबिक हिंसाचार आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सुनेच्या छळाचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

यामध्ये सुनेकडून मिळालेल्या हुंड्यावर सासरचे लोक नाराज असल्याने सासू-सासऱ्यांसह पाच जणांनी विवाहितेला अमानुष मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये सूनला जमिनीवर ओढून गंभीरपणे मारहाण केली जात असल्याचे दिसते. तसेच सून वेदनेने विव्हळताना दिसत आहे.

पतीच्या कुटुंबातील काही स्त्रिया तिला निर्दयीपणे मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. त्या तिचे केस ओढताना, तिला वारंवार चापट आणि लाथ मारतात दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे जो "मार तू, मार" म्हणत आहे.

या भीषण घटनेनंतर, 32 वर्षीय पीडित आणि शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. शारिरीक छळासोबतच तिचा मानसिक छळही कुटुंबीयांकडून होत असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच घरातील एका पुरूषाने तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

सुनेने पोलिसात घडलेली घटना सांगत पतीच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध तक्रार नोंदवली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्यानंतर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT