Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Woman Frog Necklace Viedo: एक महिला तिच्या गळ्यात मंगलसूत्राऐवजी एका जिवंत बेडकाला पेंडंट म्हणून घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Manish Jadhav

Woman Frog Necklace Viedo: सोशल मीडियाच्या जगात दररोज काहीतरी नवीन आणि धक्कादायक समोर येत असते, जे पाहून लोक कधी हसतात, तर कधी गोंधळून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला तिच्या गळ्यात मंगलसूत्राऐवजी एका जिवंत बेडकाला नेकलेस म्हणून घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, कारण ती महिला अत्यंत सहजपणे व्हिडिओ कॉलवर बोलत आहे, जणू काहीच झाले नाही.

आधी हा व्हिडिओ पाहा!

महिलेच्या गळ्यातील चेन पाहून सगळेच हैराण

व्हिडिओमध्ये एक महिला (Women) व्हिडिओ कॉलवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. कॅमेरा तिच्या चेहऱ्यावरुन तिच्या गळ्याकडे जातो आणि मग सर्वांच्याच भुवया उंचावतात. तिच्या गळ्यातील चेनच्या पेंडंटमध्ये कोणतीही साधी गोष्ट नाहीतर एक जिवंत आणि छोटासा बेडूक लटकलेला आहे. हा छोटा बेडूक अधूनमधून हलकेसे उड्या मारताना दिसत आहे, तरीही महिलेला त्याचा कोणताही फरक पडत नाही. ती पूर्णपणे आपल्या कॉलमध्ये मग्न आहे, जणू तिच्यासाठी हे सामान्य आहे.

हा व्हिडिओ खरा की AI चा चमत्कार?

सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे व्हिडिओ पाहून अनेकदा हा प्रश्न पडतो की, हे खरे आहे की एआयची (AI) कमाल आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही असाच प्रश्न मनात येतो. कारण, बेडूक ज्या सहजतेने चेनला लटकलेला दिसत आहे, ते पाहता काही लोक यावर शंका व्यक्त करत आहेत. बेडकाचे हलकेसे उड्या मारणे आणि महिलेचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजकाल एआयच्या मदतीने असे अनेक व्हिडिओ तयार केले जातात, ज्यात खरा आणि खोटा व्हिडिओ ओळखणे खूप कठीण झाले आहे.

सोशल मीडियावर धमाल: 'बेडूकसूत्र'ची चर्चा

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @inspire__.up या युजरने शेअर केला आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विनोदात म्हटले की, "हे मंगलसूत्र नाहीतर 'बेडूकसूत्र' आहे." तर दुसऱ्यांनी त्याला 'नेकलेस' ऐवजी 'बेडूकलेस' म्हटले. एका युजरने गंमतीत लिहिले, "अख्खा बेडूक समाज घाबरला आहे!"

दुसरीकडे, काही युजर्संनी मात्र प्राण्यांबद्दल सहानुभूती दाखवली. एका युजरने भावूक होऊन लिहिले, "त्याचे पाय दोरीने बांधले असतील, त्याला किती वेदना होत असतील, तो किती तडफडत असेल." आणखी एका युजरने हलक्या-फुलक्या अंदाजात म्हटले की, "शेवटी नागिणीने बेडकाची शिकार केलीच!" तर काहींनी हा व्हिडिओ केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बनवला असून, नंतर बेडकाला सोडून दिले असेल, अशी शक्यताही व्यक्त केली. हा व्हिडिओ खरा असो किंवा एआयचा चमत्कार, त्याने सोशल मीडियावर (Social Media) मात्र चांगलीच चर्चा घडवून आणली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: 19 वर्षांच्या पोरानं उडवली कांगारुंची झोप! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडवला इतिहास; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

Goa Politics: "गोव्यात एकाच घरात 80 मतदार; आता सरकारचा पर्दाफाश करू" काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT