Crime Dainik Gomantak
देश

धक्कादायक ! नवऱ्यानेच केली बायकोची निर्घृण हत्या

दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामधील ठाणे दादरी भागातील चक्रसेनपूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Greater Noida: दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामधील ठाणे दादरी भागातील चक्रसेनपूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यानंतर दादरी पोलिसांनी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (woman killed by thrashing with bricks after removing her eyes)

दरम्यान, 2014 मध्ये शिवमने त्याची बहीण रिंकी हिचे लग्न बुलंदशहर जिल्ह्यातील चैतासोबत लावले. दोघांना चार मुले आहेत. सध्या संपूर्ण कुटुंब चक्रसेनपूर गावातील भट्टीवर राहत होते. दोघे दाम्पत्य भट्टीवरच विटांचे काम करायचे. 11 जून रोजी काही कारणावरुन भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर महिलेचा पती चैता आणि त्याच्या मित्राने महिलेवर विटांनी हल्ला करुन तिचे डोळे काढले. ही घटना घडल्यानंतर पतीने मित्रासह पळ काढला.

तसेच, शेजाऱ्यांनी गंभीर अवस्थेत महिलेला दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात दाखल केले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. महिलेचा भाऊ शिवम याच्या तक्रारीवरुन दादरी पोलिसांनी (Police) घटनेच्या पाच दिवसांनंतर गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, घटनेच्या दोन दिवस अगोदरही भट्टीवर स्वयंपाक करताना पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते, असे या भट्टीवर काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींने सांगितले. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल तपास सुरु केला. त्यानंतर प्रकरण इतके गंभीर झाले की, महिलेची (Women) हत्या करण्यात आली. हत्येला अनेक दिवस उलटूनही पोलिसांना घटनेची माहिती मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT