Drugs Dainik Gomantak
देश

प्रायव्हेट पार्टमध्ये महिलेने लपवले 10 कोटींचे हेरॉईन, डॉक्टरांनी काढल्या 60 कॅप्सूल

राजस्थानमधून (Rajasthan) समोर आला आहे, जिथे युगांडातील एक महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग्ज लपवून घेऊन जात होती, मात्र विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला.

दैनिक गोमन्तक

अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्कर नवनवीन युक्त्यांचा अवलंबत करत आहेत. याच पाश्वभूमीवर तपासादरम्यान एजन्सींनी ड्रग्जचे साठे पकडले आहेत. आताही असाच काहीसा प्रकार राजस्थानमधून (Rajasthan) समोर आला आहे, जिथे युगांडातील (Uganda) एक महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग्ज लपवून घेऊन जात होती, मात्र विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला. (Woman Hides Medicine Worth Rs 10 Crore In Private Part)

प्रायव्हेट पार्टमधून 60 कॅप्सूल काढल्या

जयपूर (Jaipur) विमानतळावर एसएसएम रुग्णालयात पकडलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिलेच्या शरीरातून ड्रग्सनी भरलेले कॅप्सूल काढण्यात आले. या महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवले होते. त्यास बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागली. आतापर्यंत 60 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्याचे महसूल माहिती संचालनालय (DRI) या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी महिलेच्या शरीरातून सर्व कॅप्सूल काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ड्रग्ज दडवण्यात आले होते, याचा तपास करण्यात येत आहे. या कॅप्सूलमध्ये हेरॉईन असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत 10 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकशीनंतर न्यायालयात हजर होणार

या प्रकरणीही न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यात येणार आहे. सध्या इव्हान्स लोपेझ नावाची ही महिला रुग्णालयात असून तिची अजून चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डीआरआयचे अधिकारी त्यांची चौकशी करतील, असं सांगण्यात येत आहे. यानंतर अमली पदार्थांच्या तस्करीचे हे प्रकरण उघडकीस येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT