Mood Of the Nation | Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak
देश

Lok Sabha Election 2024: मोदी मॅजिक चालणार की विरोधकांची एकजूट निर्णायक ठरणार? घ्या जाणून...

युपीएला मिळणार 'इतक्या' जागा; एनडीए, भाजपचे नुकसान

Akshay Nirmale

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतण्याची रणनीती आखण्यात गुंतलेला असताना, विरोधकदेखील 2024 मध्ये भाजपला कोंडीत पकडण्याची योजना आखत आहेत.

दरम्यान, देशातील आज निवडणूक झाल्यास देशात काय घडेल, याबाबत जनतेचा मूड एका सर्व्हेक्षणात जाणून घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाला बहुमत मिळणार याबाबतचा हा सर्वे आहे. सर्वेक्षणात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अतिशय रंजक चित्र समोर आले आहे.

सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आले होते की, देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार असेल. या प्रश्नाला उत्तर देताना बहुमत एनडीए सरकारच्या बाजूने आले आहे. म्हणजेच आता निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल. काँग्रेसची कामगिरी सुधारली असली, तरी मोदी सरकारला हरवण्यासाठी ते पुरेसे नाही.

दरम्यान, सर्वेक्षणात NDA ला बहुमत मिळत असल्याचं दिसत असलं, तरी एनडीएसाठी चांगले संकेत नाहीत. आकडेवारीनुसार एनडीएला बहुमत दिसत असले तरी विरोधक एकत्र आल्यास सत्ता भाजपच्या हातातून निसटू शकते.

एनडीएला किती जागा मिळणार

सर्वेक्षणानुसार लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 298 जागा मिळत आहेत. त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 153 जागा मिळत आहेत. इतरांना 92 जागा मिळणार आहेत. टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर एनडीएला 43 टक्के, यूपीएला 30 टक्के तर इतरांना 27 टक्के मते मिळत आहेत.

एनडीए, भाजपचे नुकसान

2019 च्या निवडणुकीत एनडीए आघाडीला 353 जागा मिळाल्या. यामध्ये एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या, त्या या सर्वेक्षणात 286 वर आल्या आहेत. सर्वेक्षणात 2019 च्या तुलनेत एनडीएला 55 जागांचे नुकसान दिसते आहे. तर एकट्या भाजपचे 17 जागांचे नुकसान होईल.

विरोधकांची एकजूट झाल्यास चित्र बदलणार

विरोधकांची एकजूट नसताना ही स्थिती पाहणीत आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतःच्या राष्ट्रीय पक्षासह केंद्रीय सत्तेकडे नजर ठेऊन आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे लक्ष देखील केंद्रातील सत्तेचे आहे.

तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही केंद्र सरकारमध्ये सक्रीय राजकारणाच्या चर्चा सुरू आहेत.

अशा स्थितीत विरोधकांनी एकजूट दाखवल्यास लोकसभेत भाजपच्या रणनीतीला धक्का बसू शकतो. विरोधकांच्या एकजुटीमुळे एकमेकांकडे मतांचे हस्तांतरण होणार आहे.

अशा स्थितीत नवीन समीकरणे तयार होतील ज्यामुळे जागांच्या संख्येतही बदल होईल. एनडीए आघाडी बहुमतापासून दूर गेल्यानंतर नवे समीकरणही तयार होऊ शकते.

एनडीएला या राज्यांत मिळणार लाभ?

आसाम- 12 जागा (2019 मध्ये 9 जागा जिंकल्या होत्या)

तेलंगणा- 6 जागा (2019 मध्ये 4 जागा )

पश्चिम बंगाल- 20 जागा (2019 मध्ये 18 जागा)

उत्तर प्रदेश- 70 जागा (2019 मध्ये 64 जागा)

या राज्यांमध्ये युपीएला फायदा?

कर्नाटक- 17 जागा (2019 मध्ये 2 जागा जिंकल्या होत्या)

महाराष्ट्र- 34 जागा (2019 मध्ये केवळ 6 जागा जिंकल्या होत्या)

बिहार- 25 जागा (2019 मध्ये केवळ 1 जागा जिंकली होती)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT