Telangana CM KCR: तेलंगणात राज्यपालांमुळे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची 'दांडी'

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल संबोधित करणार नाहीत
Telangana Governor Vs CM KCR
Telangana Governor Vs CM KCRDainik Gomantak

Telangana Governor Vs CM KCR: आज संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. पण तेलंगणात मात्र गुरुवारी हैदराबाद येथील राजभवनात आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) हे सहभागी झाले नाहीत. राज्यपालांशी असलेल्या तणावामुळे मुख्यमंत्री केसीआर या कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत, असे सांगण्यात येते.

Telangana Governor Vs CM KCR
BBC Documentary On Modi: बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत अमेरिकेने बदलली भूमिका; आधी भारताचे केले होते कौतूक...

दरम्यान, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी हैदराबादमधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते आणि ऑस्कर नामांकित नाटू नातू संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्रबोस यांचाही सन्मान केला.

यावेळी त्यांनी बराच वेळ मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली, पण मुख्यमंत्री या कार्यक्रमात पोहचले नाहीत.

तेलंगणा सरकार आणि राज्यपाल यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी राज्यपालांचे अभिभाषणही सरकारने पाठवलेले नाही.

तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यपालांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करण्याची परंपरा आहे, मात्र यावेळी राज्यपाल सभागृहांना संबोधित करणार नाहीत.

Telangana Governor Vs CM KCR
Republic Day 2023 Highlights: प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर सैन्यशक्ती अन् संस्कृतींचा अनोखा नजराणा

राज्यपाल तमिळसाई सुंरदराजन यांनी केसीआर सरकारबद्दल तक्रार केली होती की त्यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही, तर केसीआर सरकारला राज्यपालांकडे प्रलंबित असलेली काही विधेयके आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे.

दुसरीकडे, 19 जानेवारी रोजी राज्यपाल सुंदरराजन यांनी प्रोटोकॉलचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला होता आणि त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com