Will Mamata Banerjee's TMC fight assembly elections in Goa as well as across the India Dainik Gomantak
देश

"गोवा में खेलो होबे" म्हणत दिदींच्या तृणमुलचा देशभरातील निवडणुकासांठी हुंकार ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) बॅनर्जी आता तृणमूल काँग्रेसला (TMC) राज्याबाहेरही बळकट करण्यात व्यस्त आहेत.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) बॅनर्जी आता तृणमूल काँग्रेसला (TMC) राज्याबाहेरही बळकट करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, सूत्रांनी हेही सांगितले की, तृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections) लढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसीने गोव्यात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता, आयपीएसीच्या टीमने गोव्यात काम सुरू केले आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. (Will Mamata Banerjee's TMC fight assembly elections in Goa as well as across the India)

सूत्रांच्या माहितीनुसार, टीएमसी येत्या काही दिवसांत गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणाही करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, भवानीपूरच्या आजच्या बैठकीत ममता बॅनर्जींनी "गोवा में खेलो होबे" ​​असा नाराही दिला आहे.

गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वात जास्त 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. त्यांनी 37 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्याचवेळी भाजपने 36 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि 13 जागा जिंकल्या होत्या. अपक्ष, जीएफपी आणि एमएजीकडे प्रत्येकी तीन जागा होत्या. एक जागा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने देखील जिंकली होती.

तर गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टीनेही नशीब आजमावले होते पण ती एकही जागा जिंकू शकली नाही. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले की आगामी गोवा विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर सत्तेवर आल्यास त्यांचा पक्ष खाजगी क्षेत्रासह स्थानिक लोकांसाठी 80 टक्के नोकऱ्या राखून ठेवेल. खाण आणि पर्यटन उद्योग सामान्य होईपर्यंत या क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मासिक 5 हजार रुपये मोबदला देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT