Goa Election: 20 मिनिटांची भेट आणि उत्पल पर्रीकर रिंगणात

आम्ही तुमच्यात मनोहर पर्रीकर यांना पाहतो
Goa Election:  Utpal Parrikar
Goa Election: Utpal ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल (Utpal Parrikar) हे पणजी विधानसभा मतदारसंघातून (Goa Assembly Election) भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. बुधवारी रात्री उशिरा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची 20 मिनिटे भेट घेऊन त्यांनी पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीतील पक्षाचे काम आपण पुढे कसे नेले आहे, याची सविस्तर माहिती दिली. उल्लेखनीय म्हणजे, आपणास यावेळी उमेदवारी नाकारली तर त्याचे परिणाम राज्यभरात काय होऊ शकतील, याचा अंदाजही त्यांनी आपल्या शैलीत फडणवीस यांना दिला.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळाली नसली तरी नाराज न होता उत्पल यांनी पणजीत काम करणे सुरू ठेवले. केवळ पक्षाच्याच नव्हे तर पर्रीकर यांच्यासाठी त्यांना मतदान करणाऱ्यांच्या गाठीभेटी घेणे त्यांनी सुरू केले आहे.

प्रत्येकजण त्यांना विधानसभा निवडणूक लढवा, आम्ही तुमच्यात मनोहर पर्रीकर यांना पाहतो, असे सांगू लागला आहे. याचमुळे भाजप विचारसरणीचा कट्टर विरोधकही पर्रीकर नावाच्या गारुडामुळे उत्पल यांना भेटून तुम्ही पुढे व्हा, आम्ही बाकी सारी व्यवस्था पाहतो असे सांगण्यास मागेपुढे पाहत नाही. या साऱ्या बळावर उत्पल यांनी पणजीतील उमेदवारीवर दावा करण्याचे ठरवले आणि अतिशय स्पष्ट शब्दात फडणवीस यांना आपण पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. ते इच्छुक होते हे समजण्यास फार उशीर झाला. आता उमेदवारीसाठी विचार कसा करायचा, असा तात्त्विक प्रश्न पुढे फेकण्यासाठी त्यांनी आता भाजप नेत्यांना जागाच ठेवलेली नाही.

ते पक्षाचे काम नव्हे काय?

पक्ष संघटनेतील1994 पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते आज दुर्लक्षित आहेत. त्यांच्या सुख-दुःखावेळी आपण धावून जात आहे. घराघरांत संपर्क ठेवला आहे. केवळ पक्षाचेच नव्हे तर इतर पक्षाचे कार्यकर्तेही आपुलकीने वागू लागले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलो आहे. त्याची कित्येक उदाहरणे देऊ शकेन. हे पक्षाचे काम नव्हे काय, अशी सडेतोड विचारणा उत्पल यांनी फडणवीस यांना केली आहे.

Goa Election:  Utpal Parrikar
Goa Tourist: जीवरक्षकांनी वाचविला दिल्लीच्या पर्यटकांचा जीव

दिल्लीत नाव पोहोचलेच नव्हते...

उत्पल यांना भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी दिली नव्हती. स्थानिक पातळीवरून त्यांचे नाव दिल्लीत विचारार्थ पाठवण्यात आले नव्हते, अशी बाब नंतर उघड झाली होती. म्हापशात ॲड. फ्रांसिस डिसोझा यांचे पुत्र ज्योशुआ यांच्या नावाचा दिल्लीत विचार झाला; मात्र उत्पल यांचा विचार का झाला नाही याचे कोडे मात्र त्यानंतर आजतागायत उलगडलेले नाही. कोणत्या प्रभावशाली नेत्याने उत्पल यांच्या नावाचा विचारच होऊ दिला नाही, हेही समोर आलेले नाही.

चुकीच्या माहितीच्या आधारे

फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांनी आधी पक्षाचे काम करावे आणि नंतरच उमेदवारीवर दावा करावा, असे म्हटले होते. स्थानिक पातळीवर त्यांच्यापर्यंत गेलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे फडणवीस यांनी हे विधान केल्याचे उत्पल पर्रीकर यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

मला उमेदवारी नाकारल्यास...

आपल्याला मागच्या वेळी उमेदवारी नाकारली. आता पणजीतील सारीच जनता मला विधानसभा निवडणूक लढवा, असे सांगत आहे. आता उमेदवारी नाकारल्यास त्या माहितीचा नकारात्मक परिणाम राज्यभरात होणार आहे. उमेदवारी दिल्यास पर्रीकर यांच्या वारशाची भाजपला किंमत आहे, असा सकारात्मक संदेश राज्यभरात जाईल. त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर होईल, असा मुद्दाही चर्चेत आला होता.

असे संकेत...

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ‘गोमन्तक’ शी बोलताना स्पष्ट केले, की भाजपा सरकारला स्थैर्य देणाऱ्या आमदारांना आम्हाला येत्या निवडणुकीत डावलता येणार नाही; त्यामुळे पणजीचा अधिकृत उमेदवार मोन्सेरात हेच राहणार आहेत हे आता कळून चुकले आहे.

Goa Election:  Utpal Parrikar
गोवा सरकारचा कोविडग्रस्तांना मदतीचा हात

"होय, मी निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. एकंदरीत राजकीय परिस्थितीबाबत माझे आकलन त्यांच्यासमोर मांडले. याआधी राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनाही मी भेटलो होतो. फडणवीस यांचीही पुन्हा भेट घेण्यासाठी वेळ मागणार आहे."

- उत्पल पर्रीकर, भाजपचे नेते

भाजप ज्यांना तिकीट देईल तो पक्षाचा अधिकृत उमेदवार बनेल; आम्हांला पक्षाचा निर्णय मान्य करावा लागेल. पणजीत मी, सिद्धार्थ, उत्पल पर्रीकर आहेत. त्यापैकी एकालाच उमेदवारी मिळेल.

- बाबूश मोन्सेरात, आमदार, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com