wife killed husband woman beheads husband keeps head in temple in khowai Dainik Gomantak
देश

..त्यानंतर पत्नीने पतीचे शीर कापून ठेवले देवघरात

काही दिवसांपासून ही महिला होती मानसिक त्रासाने त्रस्त

दैनिक गोमन्तक

त्रिपुरातील खोवाई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जेव्हा मुलाने आपल्या आईच्या भयंकर आणि भीषण गुन्ह्याची कहाणी सांगितली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. एका महिलेच्या मुलाने आरोप केला आहे की त्याच्या आईने तिच्या वडिलांचे डोके कापले आणि ते एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि नंतर ते देवघरात ठेवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना शनिवारी सकाळी घडली. खोवाई जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक भूपेंद्र चक्रवर्ती यांनी सांगितले की, महिलेच्या मोठ्या मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील 50 वर्षांचे होते. महिलेने कोणत्या कारणामुळे पतीची हत्या (murder) केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मोठ्या मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याची आई काही दिवसांपासून मानसिक त्रासाने त्रस्त होती आणि तिच्यावर शहरातील डॉक्टरही उपचार करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या मोठ्या मुलाने पोलिसांना सांगितले की, आई पूर्णपणे शाकाहारी आहे आणि ती नेहमी फक्त शाकाहारीच खात असते मात्र घटनेच्या रात्री तिने चिकन खाल्ले होते. रात्रीचे जेवण करून आम्ही झोपायला निघालो, पण मध्येच जाग आल्यावर पाहिले की वडिलांचे डोके धडापासून वेगळे झाले होते आणि आई धारदार शस्त्र घेऊन उभी होती आणि पूर्ण रक्ताने माखलेली होती.

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, महिलेने नंतर स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला खोलीतून बाहेर काढल्यानंतर अटक केली. घटनास्थळावरून मृतदेहही मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

SCROLL FOR NEXT