Kiren Rijiju Dainik Gomantak
देश

"...नेहरुजींनी पहिली दुरुस्ती का केली": चिदंबरम यांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या 'लक्ष्मण रेखा' या वक्तव्यावर टीका केली होती.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी किरन रिजिजू यांच्या 'लक्ष्मण रेखा' या वक्तव्यावर टीका केली होती. यातच आता, पी चिदंबरम यांच्या टीकेला उत्तर देताना रिजिजू यांनी पंडित नेहरु आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाची आठवण करुन दिली आहे. खरं तर, पी चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'देशद्रोह कायदा हा अनेक कायदेपंडितांच्या मते, घटनेच्या कलम 19 आणि 21 चे उल्लंघन करतो. राजाचे सर्व घोडे आणि राजाचे सर्व लोक ही व्यवस्था वाचवू शकली नाहीत.' (Why Nehruji made the first amendment bjp retaliates against chidambarams statement over lakshmanrekha)

दरम्यान, त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, 'भारताच्या कायदा मंत्र्यांना मनमानी पध्दतीने लक्ष्मण रेखा सूचित करण्याचा काही एक अधिकार नाही. त्यांनी घटनेतील कलम 13 चे वाचन करावे. कायदेमंडळ कायदे करु शकत नाही, तसेच मूलभूत हक्कांचे उल्लंघन कोणताही कायदा करु शकत नाही.'

किरेन रिजिजू यांनी उत्तर दिले

पी चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया आली आहे. कायदे मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी ट्विट करत म्हटले की, "म्हणूनच नेहरुजींनी पहिली दुरुस्ती आणली आणि श्रीमती इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) भारताच्या इतिहासात प्रथमच कलम 124A हा दखलपात्र गुन्हा बनवला? आणि अण्णांच्या आंदोलनात आणि इतर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात नागरिकांचा छळ, धमक्या, अटकेला सामोरे जावे लागले?

खरं तर, काल सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोह कायद्याला स्थगिती दिली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "आमची भूमिका स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हेतूबद्दल आम्ही न्यायालयाला माहिती दिली आहे. आम्ही न्यायालय आणि स्वातंत्र्याचा आदर करतो. लक्ष्मण रेखा'. भारतीय राज्यघटनेतील (Constitution) तरतुदींचा तसेच सध्याच्या कायद्यांचा आपण आदर केला पाहिजे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT