Satpura Bhavan, Bhopal. Dainik Gomantak.
देश

Satpura Bhavan : योगायोग की षडयंत्र! मध्य प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावरच सातपुडा भवनाला का लागते आग? हजारो फाइल्स जळून खाक

तब्बल 12 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. यामागे षडयंत्र असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कॉंग्रेसचा हा आरोप शिवराज सरकारने फेटाळून लावला आहे.

Ashutosh Masgaunde

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सातपुडा इमारतीत सोमवारी दुपारी अचानक आग लागली. सातपुडा भवनात राज्यातील अनेक शासकीय कार्यालये आहेत. भीषण आगीमुळे अनेक महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सातपुडा भवनला लागलेल्या आगीनंतर राज्यात राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेसने हे राज्य सरकारचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे.

आग कशी लागली?

सातपुडा भवनात दररोजप्रमाणे कामकाज सुरळीत सुरू होते. दुपारचे चार वाजले होते आणि सुट्टीची वेळ झाली होती. दरम्यान, सातपुडा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. या मजल्यावर अनुसूचित जमाती प्रादेशिक विकास योजनेचे कार्यालय आहे. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली.

Satpura Bhavan

हजारो फायली जळून खाक

आगीचे वृत्त समजताच कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच आग तिसऱ्या मजल्यावरून सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली.

आरोग्य संचालनालयाची कार्यालये चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आहेत. आगीमुळे हजारो फाईल्स जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

सातपुडा भवनात काय आहे?

सातपुडा भवन मंत्रालय इमारतीच्या उजवीकडे अरेरा टेकडीवर आहे. 1982 मध्ये सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले होते.

या इमारतीत एकूण सहा मजले आहेत. या इमारतीत 20 विभागांची कार्यालये आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन, बँक, टेलिफोन एक्सचेंज, पोस्ट ऑफिसची सुविधा आहे.

यापूर्वी दोन वेळा लागली होती आग

सातपुडा भवनला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही सातपुडा भवनला दोनदा आग लागली आहे. मात्र, याला योगायोग म्हणा किंवा काहीतरी... आगीशी संबंधित शेवटच्या दोन घटना निवडणुकांच्या आसपास घडल्या आहेत.

12 जूनला लागलेली आगही विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच लागली आहे. विशेष म्हणजे 2012 मध्ये पहिल्यांदा आग लागली होती. पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर या इमारतीला आग लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT