Operation Sindoor news Dainik Gomantak
देश

'ऑपरेशन सिंदूर'बद्दल माहिती देणाऱ्या भारतीय सेनेच्या त्या दोन 'महिला अधिकारी' कोण?

Vyomika Singh and sofiya qureshi: ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Akshata Chhatre

Women Army Officers Briefing Operation Sindoor: भारतीय सशस्त्र दलांसाठी ऑपरेशन सिंदूरचा दिवस ऐतिहासिक ठरला. 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी संयुक्तपणे माध्यमांना संबोधित केले. या उच्च-स्तरीय पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील उपस्थित होते.

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोघींनीही आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक मापदंड प्रस्थापित केले असून अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महिलांनी आघाडी दाखल्याने सगळीकडेच भारताच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

कोण आहे कर्नल सोफिया कुरेशी?

भारतीय लष्कराच्या सिग्नल कोअरमधील अधिकारी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी लष्करी इतिहासात आपले नाव कोरले आहे. ३५ वर्षीय कर्नल कुरेशी यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

मार्च २०१६ मध्ये, तत्कालीन लेफ्टनंट कर्नल कुरेशी यांनी एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावामध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला होता.

'Exercise Force 18' नावाचा हा सराव भारतातील सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता. २ मार्च ते ८ मार्च दरम्यान पुण्यात झालेल्या या युद्ध सरावात आशियायी देशांसह जपान, चीन, रशिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह १८ देशांनी भाग घेतला होता.

विंग कमांडर व्योमिका सिंग कोण?

भारतीय हवाई दलातील एक अनुभवी हेलिकॉप्टर पायलट, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर माध्यम ब्रीफिंगचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले. २,५०० तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव असलेल्या सिंग यांनी जम्मू आणि काश्मीर पासून भारतातील दुर्गम भागांमध्ये काम केलेले आहे. २०२० मध्ये, त्यांनी अरुणाचल प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बचाव कार्य केले होते.

'ऑपरेशन सिंदूर'च्या वार्तांकनात कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. भारतीय सशस्त्र दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांची वाढती भूमिका आणि सामर्थ्य यातून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT