Pakistan Firing: भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानची LOC वर फायरिंग, 7 भारतीय ठार, 38 जण जखमी; भारतीय सैन्याचेही चोख प्रत्युत्तर

Pakistan LoC shelling: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या धडक कारवाईनंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला.
Pakistan LoC shelling
Pakistan FiringDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या धडक कारवाईनंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. त्याने आपल्या नापाक कारवाया सुरु ठेवत सामान्य भारतीयांना पुन्हा एकदा टार्गेट केले. पाकिस्ताननने नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार केला. नियंत्रण रेषेजवळील गावांवर तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला, ज्यामध्ये एक महिला आणि दोन मुलांसह 7 भारतीय ठार झाले आणि 38 जण जखमी झाले. सर्व सातही मृत्यू सर्वाधिक नुकसान झालेल्या पूंछ जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे, तर 25 जण जखमी झाले. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये 10 आणि राजौरी जिल्ह्यात तीन जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या (Pakistan) या ही कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले. विभागीय आयुक्त जम्मू यांनी माहिती दिली की, सध्याची परिस्थिती पाहता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील.

Pakistan LoC shelling
Pakistan Bus Caught Fire: धावत्या बसने घेतला पेट, 30 प्रवासी होरपळले; पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील घटना

पाकिस्तानचे घृणास्पद कृत्य

पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याची कोणतीही चिन्हे दाखवत नाहीये. भारताने (India) केलेल्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा गोळीबार केला. 6-7 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील असलेल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, ज्यामध्ये तोफखान्याचा मारा करण्यात आला. या अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. तथापि याआधीही, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, ज्याला भारत जशास तसे उत्तर देत आहे.

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर स्ट्रीट आणि कुपवाडा जिल्ह्यातील कर्नह भागात गोळीबार केला. या हल्ल्यानंतर लोक घाबरले असून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते भूमिगत बंकरमध्ये लपले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com