While currently 14 lakh new cancer cases are being diagnosed in the country every year, it is estimated to increase to 20 lakh by 2040. Dainik Gomantak
देश

भारतात Cancer रुग्णांची संख्या दरवर्षी 14 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढण्याचा धोका

Cancer Patients In India: गोळा केलेला डेटा दर्शवितो की, भारतातील सर्वाधिक कर्करोगाच्या घटनांचे प्रमाण ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त आहे.

Ashutosh Masgaunde

While currently 14 lakh new cancer cases are being diagnosed in the country every year, it is estimated to increase to 20 lakh by 2040:

गेल्या दोन दशकांमध्ये भारतातील कर्करोगाच्या (Cancer) एकूण घटनांचे प्रमाण पाश्चिमात्य देशांइतके वेगाने वाढले नाही, परंतु लोकसंख्या वाढ आणि चांगल्या निदान पद्धतीुळे नवीन रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

सध्या देशात दरवर्षी 14 लाख नवीन कर्करोगाची प्रकरणे आढळून येत असताना, 2040 पर्यंत ती वाढून 20 लाख होईल असा अंदाज आहे.

ही चिंताजनक आकडेवारी नुकतेच बीकेसी येथे इंडियन कॅन्सर काँग्रेस (ICC) च्या उद्घाटनाच्या दिवशी समोर आली. जिथे तज्ञांनी रोगाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचा विस्तार करण्याची गरज अधोरेखित केली.

दर चार वर्षांनी एकदा आयोजित होणाऱ्या या आयसीसीने विविध ऑन्कोलॉजी क्षेत्रातील 5,000 हून अधिक प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे.

टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या पश्चिम किंवा ब्रिक्स देशांइतकी कर्करोगाची समस्या भारताने अनुभवली नाही.

आकडेवारी दर्शविते की, भारतातील काही सर्वाधिक कर्करोगाच्या घटनांचे प्रमाण ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त आहे.

मिझोरामची राजधानी, आयझॉलमध्ये पुरुषांना सर्वाधिक कर्करोगाची लागन होते. दर 1 लाख लोकसंख्येमागे 269.4 इतके रुग्ण आढळतात.

तर अरुणाचल प्रदेशातील पापुमपारे जिल्ह्यात महिलांमध्ये सर्वाधिक कर्करोगाचे प्रमाण नोंदवले गेले. तथापि, काही अपवाद वगळता, सर्वात मोठ्या महानगरांमध्ये देखील कर्करोगाच्या घटना एक लाख लोकांमध्ये 100-110 व्यक्तींना कर्करोगाची बाधा होते.

उदाहरणार्थ, मुंबईतील पुरूषांच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या प्रति एक लाख लोकांमागे पुरुषांमध्ये 108 तर महिलांमध्ये 116 आहे, जे 2001 पासून तुलनेने स्थिर आहे.

आयसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय शर्मा यांनी यावर भर दिला की, जरी रुग्णाचे प्रमाण स्थिर असले तरी, आरोग्य सुविधांवर मोठा भार पडत आहे. सरकारने अधिकाधिक कर्करोग रुग्णालये स्थापन करण्यासाठी खासगी क्षेत्राला अनुदान द्यावे, अशी शिफारस त्यांनी केली.

डॉ. बडवे पुढे म्हणाले की, टीएमसीने नऊ नवीन कर्करोग रुग्णालये तयार केली आहेत आणि आणखी सहा रुग्णालये सुरू करणार जोडणार आहेत. त्यामुळे 2033 पर्यंत भारतात पुरेशी कर्करोग केंद्रे असतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

टीएमसीचे डॉ श्रीपाद बाणावली यांनी सांगितले की, मोठ्या शहरांमध्ये कर्करोग तज्ञांची कमतरता आता चांगल्या प्रकारे भरून काढली गेली आहे आणि भारत ऑन्कोलॉजीच्या विविध शाखांसाठी सुमारे 1500 तज्ञ तयार करत आहे.

तथापि, लहान शहरांमध्ये कर्करोग केंद्रांच्या वाढीस समर्थन देण्यासाठी, डॉक्टरांना देखील या भागात स्थलांतरित करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT