Video: Gurpatwant Singh Pannun कडून एअर इंडियाचे विमान उडवण्याची धमकी

Gurpatwant Singh Pannu: बेअंत सिंग आणि सतवंत सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा रक्षक होते, ज्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.
Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannu
Khalistani Terrorist Gurpatwant Singh PannuDainik Gomantak
Published on
Updated on

Video Gurpatwant Singh Pannun threatens to blow up an Air India flight:

खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पन्नू ज्या गोष्टी सांगत आहेत ते भयानक आहेत.

गुरपतवंत सिंग पन्नू हा शिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेचा नेता आहे. त्याने १९ नोव्हेंबरला एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिली आहे.

व्हिडीओमध्ये पन्नू शीखांना संबोधित करताना म्हणतो की, तुम्ही १९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका. असे केल्यास तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.

एवढेच नाही तर पन्नूने 19 नोव्हेंबरला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याची धमकीही व्हिडिओमध्ये दिली आहे. तो म्हणाला की, 19 नोव्हेंबर हा तोच दिवस आहे ज्या दिवशी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामनाही आहे.

त्या दिवशी शिखांवर होणारे अत्याचार जगाला दिसतील आणि पंजाबच्या स्वातंत्र्यानंतर विमानतळाचे नावही बदलले जाईल, असे पन्नू पुढे म्हणाला.

या विमानतळाला बेअंत सिंग, सतवंत सिंग यांचे नाव देण्यात येणार आहे. बेअंत सिंग आणि सतवंत सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा रक्षक होते, ज्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannu
Mukesh Ambani यांना 400 कोटींच्या खंडणीसाठी धमकावणारा गजाआड

याआधीही गुरपतवंत सिंग पन्नूने भारतावर हल्ल्या करण्याची धमकी दिली होती. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतरही पन्नूने एक व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये त्याने हमासप्रमाणे भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले. दहशतवादी पॅराग्लायडरमधून इस्रायलमध्ये घुसले आणि 1400 हून अधिक इस्रायली लोकांची हत्या केली. हमासने 240 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते.

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannu
Watch Video: जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर गोळीबाराचा थरार, 27 विमानांची उड्डाणे रद्द

उल्लेखनीय आहे की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीप सिंह निज्जरच्या कॅनडातील हत्येसंदर्भात संसदेत दिलेल्या निवेदनात भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात कटुता आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com