Systematic Investment Plan
एसआयपी (SIP) ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची एक नियोजनबद्ध पद्धत आहे. यामध्ये गुंतवणूकदार ठराविक रक्कम नियमित अंतरानं (मासिक, वार्षिक) गुंतवू शकतो. यामुळ मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्याचा ताण येत नाही आणि लहान-लहान गुंतवणुकीद्वारे मोठा निधी तयार होतो.
गुंतवणूकदार एक ठराविक रक्कम निवडतो (उदा. ₹500, ₹1000 किंवा त्याहून अधिक). ही रक्कम दरमहा निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेत जमा होते. त्यानुसार यूनिट्स खरेदी केल्या जातात (NAV – Net Asset Value वर आधारित). दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धत आहे.
एसआयपी नियमित गुंतवणूक केल्यास भविष्यात आर्थिक स्थिरता आणि संपत्ती वाढवण्यासाठी एसआयपी मोठी मदत करू शकते.
लहान गुंतवणुकीतून मोठी बचत, दरमहा थोडीशी रक्कम गुंतवून मोठा निधी तयार करता येतो.
मार्केट खाली-वर झालं तरी सरासरी किंमतीने गुंतवणूक होऊ शकते.
जितका जास्त कालावधी, तितका अधिक परतावा मिळण्याची संधी.
तुम्ही हवे तेव्हा गुंतवणूक सुरू किंवा थांबवू शकता.
काही SIP योजना (ELSS - Equity Linked Savings Scheme) अंतर्गत सेक्शन 80C खाली कर सवलत मिळू शकते.
गरजेनुसार रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.
Equity SIP – शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे फंड, जास्तीचा परतावा मिळवण्यासाठी.
Debt SIP – स्थिर परतावा देणारे कमी जोखमीचे गुंतवणूक पर्याय.
Hybrid SIP – इक्विटी आणि डेट मिक्स असलेले फंड, संतुलित जोखीमसाठी.
म्युच्युअल फंड योजना निवडा – तुमच्या उद्दिष्टानुसार योग्य फंड निवडा.
रक्कम आणि कालावधी ठरवा – दरमहा किती गुंतवायचे आणि किती वर्षे गुंतवणूक करायची हे ठरवा.
डिमॅट खाते किंवा म्युच्युअल फंड खाते उघडा – बँक किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गुंतवणूक सुरू करू शकता.
शेअर बाजारातील जोखीम टाळून सरासरी परतावा मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी तसंच अल्प रक्कम गुंतवून हळूहळू मोठी बचत करायची असलेल्या व्यक्तींसाठी एसआयपी योग्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.