जर आपल्याला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. आता सरकार (Government) लोकांना 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021 (Union Budget 2021) मध्ये केंद्राने पायाभूत सुविधांच्या निधीसाठी विशेषतः विकास वित्तीय संस्था (DFI) तयार करण्याची योजना जाहीर केली होती. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (NIP) अंतर्गत 2024-25 पर्यंत 7000 प्रकल्पांवर 111 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची केंद्राची योजना आहे. (What an offer: Now Government will give you Rs 15 lakh for naming this institution)
My Gov India च्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वेळेवर मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. यासाठी आपण 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकता. या स्पर्धेत जो विजयी होईल त्याला पुरस्कार म्हणून 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत.कोणी आनंदाने भीक मागत नाही; कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले
करावे लागेल हे काम
वित्त सेवा मंत्रालयआणि वित्त मंत्रालयाने लोकांकडून डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिटय़ूट (DFI) साठी संस्थेचे नाव, त्यासाठी एक टॅगलाइन आणि लोगो डिझाइन सुचविण्यासाठी लोकामना आमंत्रित केले आहे. मात्र संस्थेचे नाव, लोगो आणि टॅगलाइन त्याच्या कार्याशी संबंधित असणे गरजेचे असणार आहे.
नाव, टॅगलाइन आणि लोगोमध्ये डेवलपमेंट फाइनेंशियल इंस्टीट्यूशन च्या स्थापनेमागील हेतू दर्शविणे आवश्यक आहे. हे तीनही नावे, टॅगलाइन आणि लोगो वेगवेगळे असावेत, परंतु या तीन्हीमध्ये साम्य असणे गरजेचे आहे.
तुम्ही याप्रमाणे नोंदणी करू शकता
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी, आपल्याला सर्वात आधी mygov.in पोर्टलवर जावे लागेल. येथे आपल्याला कांटेस्ट मध्ये जावून लॉगिन टू पार्टिसिपेट टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर नोंदणीचा तपशील भरावा लागेल. नोंदणीनंतर, आपल्याला आपली एंट्री सबमिट करावी लागेल.
असे असेल बक्षीसाचे स्वरूप
या स्पर्धेत संस्थेचे नाव सुचविण्याकरिता
पहिले पारितोषिक 5,00,000 रूपयांचे असणार आहे.
द्वितीय पारितोषिक 3,00,000 रुपयांचे असणार आहे.
तृतीय पारितोषिक 2,00,000 रुपयांचे असणार आहे.
टॅगलाईनसाठी
पहिले बक्षीस 5,00,000 रुपयांचे असणार आहे.
दुसरे बक्षीस 3,00,000 2,00,000
तिसरे बक्षीस 2,00,000 रुपयांचे असणार आहे.
लोगोसाठी
पहिले पारितोषिक 5,00,000 रुपयांचे असणार आहे.
दुसरे पारितोषिक 3,00,000 रुपयांचे असणार आहे.
आणि तृतीय पारितोषिक 2,00,000 रुपयांचे असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.