West Bengal Landslide Dainik Gomantak
देश

West Bengal Landslide: दार्जिलिंगमध्ये पावसाचं रौद्ररूप! भूस्खलनाने हाहाकार; लोखंडी पूल कोसळला, अनेकांचा मृत्यू Watch Video

Darjeeling bridge collapse: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक धातूचा पूल कोसळला आणि या भागात भूस्खलन होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला.

Sameer Amunekar

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात रविवारी (५ ऑक्टोबर) मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सिलिगुडी आणि मिरिकला जोडणारा दुधिया परिसरातील बालासन नदीवरील लोखंडी पूल रविवारी सकाळी कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या पर्वतीय भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मिरिक परिसरात झालेल्या भूस्खलनात किमान चार जणांचा मृत्यू झाला असावा, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दार्जिलिंगचे भाजप खासदार राजू बिस्ता यांनी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यांनी सांगितले, "दार्जिलिंग आणि कालिम्पोंग जिल्ह्यांच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल मला खूप दुःख झाले आहे. अनेकांचा मृत्यू झाला असून पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे," अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दार्जिलिंगसह उत्तर बंगालच्या अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कालिम्पोंग, कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अलीपुरद्वारसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे.

कोलकात्यातील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार येथे दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा धोका कायम असल्याचे सूचित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि संवेदनशील भागांतून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्य सरकारने बचाव पथकांना तत्काळ कार्यरत राहण्याचे आदेश दिले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची मदतही घेण्यात आली आहे. पर्वतीय भागांतील रस्ते वाहतूक आणि संपर्कव्यवस्था कोसळल्याने बचावकार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT