Vice President Election 2022, Mamata Banerjee TMC Dainik Gomantak
देश

विरोधकांच्या एकीला ममतांकडूनच धक्का; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय

पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस उपराष्ट्रपती निवडणुकीतील मतदान प्रक्रियेपासून दूर

दैनिक गोमन्तक

Vice President Election 2022: देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी आघाडीतील काँग्रेसप्रणित युपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

मात्र या मतदानापूर्वीच विरोधकांच्या एकीला धक्का बसला आहे. पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस पक्ष उपराष्ट्रपती निवडणुकीतील मतदान प्रक्रियेपासून दूर राहणार आहे. पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी बैठकीनंतर माध्यमांना ही माहिती दिली. उमेदवार काँग्रेसच्या असल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राज्यसभेतील आकडेवारीमुळे बॅनर्जी यांचा हा निर्णय भाजपच्याच पथ्यावर पडण्याची जास्त शक्यता आहे.

अभिषेक बॅनर्जी या निर्णयाबाबत सांगताना म्हणाले, कालीघाट येथील पक्ष कार्यालयात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तृणमूलचे सर्व नेते आणि कार्यकर्ते 21 जुलैच्या शहीद सभेत व्यस्त होते. गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे 33 खासदार उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत सर्व खासदारांनी मनमोकळेपणाने आपले मत मांडले.

जगदीप धनखड जोपर्यंत राज्यपाल होते, तोपर्यंत त्यांनी पक्षाचे नेते आपण म्हणून हल्लाबोल केला होता. सोबतच आताही एनडीएच्या उमेदवाराला कोणत्याही किंमतीत पाठिंबा देणार नाही. दुसरी बाब म्हणजे मार्गारेट अल्वा यांना देखील तृणमूल काँग्रेस पाठिंबा देणार नाही. तृणमूल मतदानापासूनच दूर राहणार असल्याचे या बैठकित निश्चित झाले. उपस्थित 85 टक्के खासदारांनी यासारखेच मत मांडले. सर्व खासदार आणि पक्षाच्या नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT