Wedding photographer fined by Consumer Commission for not delivering wedding videos on time. Dainik Gomantak
देश

Wedding Photographer: लग्नाचे व्हिडिओ वेळेत न दिल्याने वेडिंग फोटोग्राफरला ग्राहक आयोगाकडून दंड

Wedding Photographer: लग्नाचे व्हिडिओ कव्हरेज देण्याचे आश्वासन देऊनही, आनंद नल्लापेटे यांनी विविध कारणे सांगून ते देण्यास विलंब केला होता.

Ashutosh Masgaunde

Wedding photographer fined by Bangalore Consumer Disputes Redressal Commission for not delivering wedding videos on time:

बेंगळुरू जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने, नुकतेच एका वेडिंग फोटोग्राफरला संपूर्ण पैसे मिळूनही लग्नाची व्हिडिओ सीडी ठरलेल्या वेळेत न दिल्याबद्दल एका ग्राहकाला व्याजासह 20 हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले.

अध्यक्ष एम शोभा आणि सदस्य के अनिता शिवकुमार आणि सुमा अनिल कुमार यांच्या कॉरमने नमूद केले की, वेडिंग फोटोग्राफरची कृती या लग्न झालेल्या जोडप्यासाठी अन्यायकारक होती. कारण लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ मौल्यवान मानले जातात ठरलेल्या वेळेत ते ग्राहकाला न मिळणे चुकीचे आहे.

"लग्नाची छायाचित्रे आणि व्हिडिओ मौल्यवान असल्याने ती तक्रारदाराला ठरलेल्या वेळेत न देणे अन्यायकारक आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी ठरलेली संपूर्ण रक्कम आगाऊ मिळूनही फोटोग्राफर आपले आश्वासन पाळण्यात अपयशी ठरला. त्यामुळे, ही सेवेची कमतरता आहे आणि त्याची भरपाई करण्यास जबाबदार आहे," असे आयोगाने म्हटले आहे.

तक्रारदाराने 5 मार्च 2021 रोजी तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी फोटोग्राफरला एकूण 80 हजार रुपये देऊन नियुक्त केले होते. फोटो अल्बम आणि लग्नाच्या व्हिडिओ कव्हरेजसाठी ही रक्कम देण्यात आली होती.

15 जानेवारी 2021 रोजी फोटोग्राफरला 5 हजार रुपये एडव्हान्स रक्कम देण्यात आली होती. तक्रारदाराने फोटो अल्बम आणि सीडी मिळाल्यानंतर उर्वरित रकमेचा एक भाग लग्नाच्या दिवशी देण्याचे मान्य केले होते.

लग्नाला 15 दिवस उलटून गेले आणि 80 हजार रुपये पूर्ण दिले असतानाही फोटोग्राफरने सीडी देण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

फोटोग्राफरला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती, परंतु त्याला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे जिल्हा मंचासमोर तक्रार करण्यात आली. तक्रारदाराने मानसिक त्रास आणि खटल्याच्या खर्चासाठी 2 लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा केला आहे.

फोटोग्राफरने 15 दिवसांत सीडी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यास विलंब झाल्यावर त्याला इडिटर मिळण्यात अडचणी येत होत्या असा दावा त्याने केला.

दाम्पत्याकडून 65 हजार रुपये येणे आहे असे आरोप फोटोग्राफरने केला. मात्र याचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा त्याला सादर करता आला नाही.

आयोगाने म्हटले आहे की, जर फोटोग्राफरने आधीच सीडी तयार केली असेल, तर तो नुकसानभरपाईसह ती जोडप्याला सुपूर्द करण्यास जबाबदार आहे. कारण लग्नाच्या आठवणी पुन्हा तयार करता येणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT