weather update Dainik Gomantak
देश

अनेक राज्यांमध्ये पारा घसरणार अन् पाऊसही बरसणार

दररोजप्रमाणे आजही अनेक राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .

दैनिक गोमन्तक

Weather Update Today: उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. दिल्लीतही पारा चार ते पाच अंश सेल्सिअसने खाली आला आहे. मात्र, आजपासून पुढील दोन दिवस दिल्लीच्या हवामानात (Weather Updates) वेगळाच बदल होण्याची शक्यता हवामान (IMD) खात्याने वर्तवली आहे. दोन्ही दिवशी राजधानीत (Delhi) जोरदार वारे वाहण्याची अपेक्षा आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आजचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहील. राष्ट्रीय राजधानीत दोन दिवस जोरदार वारे वाहतील. दुसरीकडे, गुजरातमध्ये उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. अहमदाबादमध्ये आज किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळबद्दल बोलायचे झाले तर, आजचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहील. आकाशात सूर्यप्रकाश असेल. डेहराडून, उत्तराखंड येथे आजचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. जयपूरचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहील. आकाशात तेजस्वी सूर्यप्रकाश असेल.

इतर राज्यांच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, जम्मूचे किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. मात्र, आकाश अंशतः ढगाळ राहील. आजही यूपीमध्ये ऊन असेल. मात्र, तापमानात फारसा बदल होण्याची चिन्हे नाहीत. लखनौमध्ये आजचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहील.

याशिवाय हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिमल्यात आज पाऊस पडेल आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्याच वेळी, कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. श्रीनगरमध्ये आजचे किमान तापमान 9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस राहील.

दररोजप्रमाणे आजही अनेक राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज ओडिशा, केरळ, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, अंदमान आणि निकोबारमध्ये हलका पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी काही भागात हलका रिमझिम पाऊस पडला, त्यामुळे तापमानात काहीशी घट नोंदवण्यात आली.

गोव्यात पारा घसरणार : पाऊसही बरसणार

आज राज्यात एप्रिल महिन्यातील सर्वाधिक कमाल 36.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तारखेपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहील, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, शनिवारपासून तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कमाल 36.2अंश सेल्सिअस, तर किमान 26.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT